हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसायातून (Poultry Farming) मिळणारे उत्पन्न हे अतिशय चांगल्या प्रमाणात मिळत होते. मात्र आता या व्यवसायात नफा मिळण्याचे प्रमाण कमी होताना दिसतेय. शेतीत सर्वकाही पिकांच्या बाजारभावावर भविष्य अवलंबून असते. आता कुक्कुटपालन व्यवसायात पिलांना लागणाऱ्या खाद्यपदार्थात दरवाढ झाली आहे. यामुळे या व्यवसायाचा लोचा झाला आहे.

पोल्ट्री फार्मिंग संपूर्ण मार्गदर्शनासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
या व्यवसायात खाद्याचे बाजारभाव वाढण्याआधी प्रत्येक पिलांवर कमी खर्च करून काही पैसे शिल्लक राहत होते. मात्र आता वाढलेल्या खाद्य पदार्थामुळे पिलावर ८५ रुपये खाद्यासाठी खर्च करावा लागतो. ७० रुपये फक्त विक्री मिळते. तसेच कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. महिनाभरापासून कुक्कुटपालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र काही दिवसापासून दरात सुधारणा पहायला मिळते.
कुक्कुटपालन व्यवसायातील एक कोंबडी दिवसाला ११० ग्रॅम दाने, धान्य खाते. १२० ते १५० दिवसाने अंडी घालते. याचा फायदा कुकुटपालकांना होत नाही. कोंबड्यांच्या खाद्यात मुख्यतः मका, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरीचा समावेश होतो. तसेच खाद्यवाढीमुळे कोंबड्यांच्या दरात घट झाली. ३० रुपयांवरून १७ ते १८ रुपयांवर दर आले. तसेच कोंबड्यांच्या खाद्याचे मागील दर आणि आताचे दर हे खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहेत. Poultry Farming
खाद्य – मागील दर – आजचे दर
सोयाबीन पेंड – ४५ – ४७
मका – २१ – २३
तांदूळ कणी – १५ – २०
शेंगदाणा ढेप – ३० – ३२