फायदेशीर व्यवसाय कर्ज योजना: भारतीय महिला बँक देते आहे 7 वर्षाच्या लवचिक परतफेडीसह 20 कोटी कर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । महिलादेखील सध्या व्यवसायात सक्रिय होत आहेत. भारतात अनेक महिला उद्योजक उदयाला येत आहेत म्हणूनच अशा महिलांसाठी भारतीय महिला बँकेने भारतीय महिला बँक व्यवसाय कर्ज योजना सुरू केली. रिटेलमध्ये नवीन व्यवसाय आणि एसएमई सुरू करण्यास इच्छुक असलेल्या महिला उद्योजकांसाठी फायदेशीर व्यवसाय कर्ज योजना ही योजना लागू केली गेली आहे. यासाठी जास्तीत जास्त २० कोटी रुपयांची कर्जे आणि ०.२५ टक्के सवलत देण्यात आली आहे. या कर्जावरील व्याज दर 10.15% किंवा त्याहून अधिक आहे.

ही बँक २०१७ मध्ये भारतीय स्टेट बँक (एसबीआय) शी जोडलेली होती. या योजनेद्वारे महिला व्यवसाय सुरु करू शकतात तसेच आपला व्यवसाय वाढवू देखील शकतात. सोबत उत्पादन उद्योगासाठीही २० कोटी पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कर्ज योजनेचा लाभ घेऊन महीला आत्मनिर्भर होऊ होऊ शकतात. महिला उद्योजकांना या योजनेत व्याज दरामध्ये २५% सवलत दिली जाते.

जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंतच्या मुदतीत या कर्जाची परतफेड करता येते. जर तुमच्या कर्जाची रक्कम कमी असेल तर, या परिस्थितीत तुम्हाला काहीही तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. भारतीय महिला बँकेच्या व्यवसाय कर्जाचे व्याज दर हे कर्जानुसार १५ पासून १३.६५%पर्यंत आहेत. अर्जदारांच्या प्रकारानुसार जास्तीत जास्त व्यवसाय कर्जाची रक्कम दिली जाते. उद्योग आणि किरकोळ व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त ५ कोटी कर्जाची सुविधा पुरविली जाते. उत्पादन उद्योगांसाठी जास्तीत जास्त २० कोटी कर्जाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो हे पण वाचा –

शेतकऱ्यांनो तुम्हीही पशुपालनासोबत उद्योग सुरु करू इच्छिता ? सरकार करेल आर्थिक मदत

GOOD NEWS: दूध उत्पादनात होणार वाढ ; गाई-म्हशी फक्त मादी वासरेचं जन्माला घालू शकणार

जाणून घ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०२१ , ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत लिलाव सुरु , पहा काय आहे दर ?

PM Kisan योजनेचा 8 वा हप्ता होतोय जमा; पहा तुमचा status, ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

Leave a Comment

error: Content is protected !!