हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात यावर्षी बेदाण्याचे (Raisin Market) उत्पादन दोन लाख 20 हजार टन झाले आहे. गतवर्षी दोन लाख 70 हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. यंदा त्यामध्ये 50 हजार टनांची घट झालेली आहे. उत्पादन मर्यादित असल्यामुळे बेदाण्याचे (Raisin Market) दर प्रति किलो 130 ते 250 रूपयांपर्यंत आहेत.
महाराष्ट्रामध्ये तीन ते चार लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. यातून दरवर्षी 30 लाख टनांपर्यंत द्राक्षाचे उत्पादन होते. देशात द्राक्षाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होत आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक द्राक्ष (Nashik Grapes) उत्पादनात नंबर एक असून, त्यानंतर सांगली (Sangali Grapes) जिल्ह्याचा नंबर लागत आहे.
सोलापूर जिल्ह्यात 3.09 टक्के व उस्मानाबाद जिल्ह्यात 2.69 टक्के द्राक्ष उत्पादन होते. उरलेली 3.15 टक्के द्राक्षांचे उत्पादन अहमदनगर, पुणे, लातूर, जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धुळे, बुलढाणा व जालना जिल्ह्यांत होत आहे. 2022-23 च्या हंगामामध्ये महाराष्ट्रात द्राक्षाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे दर कमी होते.
दर नसल्यामुळे शेतकरी बेदाण्याकडे (Raisin Market) वळला होता. यामुळे बेदाण्याचे विक्रमी दोन लाख 70 हजार टनांपर्यंत उत्पादन (Raisin Production) झाले होते. शीतगृहे बेदाण्याने फुल्ल झाली होती. परिणामी बेदाण्याचे दरही पडले. यामुळे उत्पादक शेतकरी नाराज होते.
2023-24 च्या हंगामामध्ये अनेक शेतकर्यांनी द्राक्षबागाच काढून टाकल्या. अवकाळी पावसाचाही फटका बसल्यामुळे उत्पादन घटले आहे. द्राक्षांना दरही चांगला राहिल्यामुळे शेतकर्यांचा बेदाणा तयार करण्याकडे फारसा कल दिसून आला नाही. त्यामुळे या वर्षी दोन लाख 20 हजार टनांपर्यंत बेदाण्याचे उत्पादन (Raisin Market) झाले आहे. उत्पादन कमी असल्यामुळे प्रति किलो 130 ते 250 रुपये दर मिळत आहे.
बेदाण्याचे दर/ प्रति किलो (Raisin Market Rate)
बेदाणा प्रकार – दर
• हिरवा बेदाणा – 150 ते 250
• पिवळा बेदाणा – 120 ते 170
• काळा बेदाणा – 40 ते 70