हॅलो कृषी ऑनलाईन : रक्षाबंधनाचा सण एवढ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभर तर हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो मात्र परदेशात राहणारे भारतीय देखील हा सण साजरा करतात. त्याकरिता भारतातून मोठ्या प्रमाणावर राख्या खरेदी करण्यात येतात. मात्र याचा संधीचं काही महिलांनी सोनं केलं आहे. या महिलांनी शेणापासून राख्या बनवल्या आहेत. विशेष म्हणजे या महिलांना अमेरिकेतून राख्यांसाठी ऑर्डर मिळाली आहे.
गुजरातमधील महिलाही रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर राख्या बनवत आहेत. विशेष म्हणजे या महिला शेणाचा वापर करून राख्या बनवत आहेत. त्यांच्या राख्यांसाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही ऑर्डर येतायत.
गाईच्या शेणापासून बनवलेल्या राख्या
भारत हा नवनिर्मितीचा देश मानला जातो. स्वावलंबी भारताचा प्रचार करण्यासोबतच गुजरातमधील जुनागडमधील महिला शेणापासून राख्या बनवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांना रोजगारही मिळत आहे.
कोरोना नंतर मोठी मागणी
एकीकडे देशात कोरोना महामारीने अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि देशातील लोकांचा रोजगार हिसकावून घेतला असतानाच दुसरीकडे कोरोनाने अनेकांना रोजगाराची दारेही खुली केली आहेत. कोरोनाच्या काळात इंटरनेट लोकांसाठी वरदान ठरले आहे. , लघु आणि अनोख्या उद्योगांना इंटरनेटच्या माध्यमातून नवी ओळख मिळाली आहे.
तसेच गुजरातमधील जुनागढच्या महिलांचा हा व्यवसाय भारतातच नाही तर अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. ते म्हणतात की, कोरोनापूर्वी फक्त 500 राख्या बनवल्या जात होत्या. मात्र आता वाढत्या मागणीमुळे सुमारे 20 हजार राख्या बनवल्या जात आहेत. आता त्यांच्या राख्यांची मागणी अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे.