Rice Planting Machine: मजूर टंचाईवर मात करण्यासाठी, भात लावणी यंत्राचा वापर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी क्षेत्रात सध्या यांत्रिकीकरण (Rice Planting Machine) वेगाने वाढत आहे. यामागे वेगवेगळी कारणे असली तरी महत्त्वाचे कारण आहे मजूरांची टंचाई (Labor Shortage).  

शहरीकरणामुळे (Urbanization) पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकर्‍यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती (Rice Planting Machine) केली आहे.

सध्याच्या घडीला मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत असून शेती करणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी यंत्राच्या सहाय्याने भात लावणीकडे (Rice Planting Machine) वळू लागला आहे. तळोजा मधील मधुसूदन पाटील, वैभव पाटील या शेतकर्‍यांनी यंत्रणेच्या मदतीने भात लागवड करून परिसरातील शेतकर्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे पनवेल तालुक्यात भात शेतीसाठी (Rice Farming) मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. बाहेरील गावातून मजूर आणून भात लागवड करणे, त्यासाठी वाहन भाडे, दिवसाची मजुरी आणि मजूरांचा थकवा दूर करण्यासाठी वेगळे खर्च करावे लागते.

त्यात बी-बियाणे, खताच्या दारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा अडचण शेतकरी व्यक्त करीत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी बहुतांश शेतकरी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करताना दिसून येत आहे.

भात लावणी यंत्राचे (Rice Planting Machine) फायदे

  • चिखलनी व लागवड करावी लागत नाही.
  • लागवड खर्चात पूर्णपणे बचत ट्रॅक्टरवर होणारा खर्च वाचतो
  • शेतमजूर, मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागत नाही.
  • हवामान बदलाचा पिकांवर कमी प्रमाणात प्रभाव पडतो.
  • अधिक नफा प्राप्त होतो.
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.