Richest Village In Rajasthan: राजस्थानातील हे आहे ‘करोडपती गाव’, रहिवासी दरवर्षी भरतात 5 कोटी कर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शहरामध्ये मोठ्या प्रमाणात करोडपती उद्योजक, (Richest Village In Rajasthan) व्यावसायिक असतात जे अर्थव्यवस्थेला हातभार लावतात. त्यामानाने ग्रामीण भागात फार कमी लोक असतात जे करोडो रुपये आयकर भरत असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा गावाबद्दल माहिती देणार आहोत ज्या गावातील रहिवासी कोटी रुपये कर भरतात (Richest Village In Rajasthan). ऐकून आश्चर्य वाटते ना? पण हे खरं आहे.

राजस्थानमधील (Rajasthan) नोखा तालुक्यातील एक लहानसे गाव, रासीसर (Rasisar), आपल्या समृद्धीसाठी आणि वाहतूक व्यवसायासाठी (Transport Business) प्रसिद्ध आहे. हे गाव अनेक जिल्ह्यांपेक्षाही जास्त महसूल देते आणि त्यातील रहिवासी दरवर्षी 5 कोटी रुपये कर भरतात (Richest Village In Rajasthan).

या गावात 5 हजाराहून अधिक लहान-मोठी वाहने आहेत. यात 1500 ट्रक-ट्रेलर-डंपर, 125 लहान-मोठ्या बसेस, 728 पिकअप-कॅम्पर, 806 लक्झरी कार आणि ऑटोसह अनेक वाहने समाविष्ट आहेत. गावात 2000 हून अधिक दुचाकी देखील आहेत (Richest Village In Rajasthan).

गावात लक्ष्मी नांदते (Richest Village In Rajasthan)

या ‘करोडपती’ गावात (Crorepati Village In India) समृद्धीची झलक सर्वत्र दिसून येते. दोन ग्राम पंचायती असलेले हे गाव वीज, पाणी, आरोग्य सुविधा आणि चांगल्या रस्त्यांनी युक्त आहे. गावात पाच सरकारी शाळा, सीएचसी आणि आयुर्वेद रुग्णालय तसेच पशुवैद्यकीय रुग्णालय आहे.

गावाचा इतिहास 

गावातील मंडा कुटुंबाने 1978 मध्ये वाहतूक व्यवसाय सुरू केला. त्यांनी एका ट्रकने सुरुवात करून आज संपूर्ण गाव या व्यवसायात सहभागी केले आहे. मंडा कुटुंबाकडे 100 ट्रक-ट्रेलर आणि 25 बसेस आहेत (Richest Village In Rajasthan).

गावाची प्रेरणा

रासीसर हे राजस्थानमधील एक आदर्श गाव आहे जे आपल्या कठोर परिश्रम आणि उद्योजकतेने समृद्धी गाठू शकते याचे प्रतीक आहे. हे गाव इतर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांनाही यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करते.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.