हॅलो कृषी ऑनलाईन: वेगवेगळ्या पारंपारिक व गावरान जातीचे बियाणे (Seed Bank) दिवसेंदिवस लुप्त होत आहेत. पर्यावरणाचा (environment) समतोल आणि विविधता टिकवून ठेवण्यासाठी दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या वनस्पती व वृक्षांची लागवड आणि संगोपनासाठी ‘पर्यावरण गतिविधी’ या संस्थेने पुढाकार घेत बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana District ) ठिकठिकाणी ‘सीड बँकेची’ (Seed Bank) स्थापना केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांत पूर्वी आढळण्या दुर्मिळ वनस्पती व वृक्षांची (Rare Plants & Trees) घटती संख्या पाहता त्यांचे योग्य संवर्धन (Rare Plant Conservation) व्हावे, पुढच्या अनेक पिढ्यांना या वनस्पती व वृक्षांचा लाभ मिळावा, या हेतूने ‘पर्यावरण गतिविधी’ (Paryavaran Gatividhi) या पर्यावरणप्रेमी संस्थेकडून जिल्ह्यातील विविध शहर व ग्रामीण भागात दुर्मिळ झाडांच्या बियांची पेढी अर्थात “सीडबैंक” (Seed bank) उघडण्यात आली आहे. ज्या नागरिकांकडे अशा दुर्मिळ वनस्पती व वृक्षांची बीज, बिया उपलब्ध आहेत, त्यांच्याकडून त्या संकलित करून त्यांची लागवड या माध्यमातून केली जाईल. पावसाळ्याच्या तोंडावर ही सीडबॅक सध्या महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असून ही एक लोक चळवळ होण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागरिकांचा सहभाग आवश्यक
नागरिकांनी प्रामुख्याने त्यांच्याकडे उपलब्ध दुर्मिळ वनस्पती व वृक्षांचे बीज नजीकच्या सीड बँके’त (Seed Bank) जमा करावे, त्याची योग्य ठिकाणी लागवड करून त्याचे संगोपन करणार असल्याची माहिती पर्यावरण गतिविधीचे विभाग संयोजक ओमप्रकाश गोंधने व जिल्हा संयोजक उमेश जपे यांनी दिली आहे.
80 प्रकारच्या बियाण्यांचे संकलन (Rare Plant Seeds)
पर्यावरण गतिविधीत सहभागी सुमारे 45 जणांकडून प्रामुख्याने ‘पेड, पाणी आणि पॉलिथीन’ या तीन घटकांसाठी काम केले जाते. यासह ‘हरित घर’ अंतर्गत घरोघरी जनजागृती केली जात आहे. दरम्यान ‘सीडबॅक’ (Seed Bank) उपक्रमाअंतर्गत आजवर विविध 80 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती व वृक्ष बीजांचे संकलन केले आहे.
कुठे-कुठे आहेत ‘सीड-बँक’?
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, जानफेळ, लोणार, उदयनगर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, जयभवानी जगदंबा उत्सव मंडळ संभाजीनगर चिखली, स्टुडन्ट गॅलरी सुलतानपूर येथे या सीड बँक (Seed Bank) आहेत.