हॅलो कृषी ऑनलाईन: आता बियाणे प्रक्रिया संचासाठी (Seed Treatment Setting Subsidy) सुद्धा मिळणार अनुदान. शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) जे व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी ही आहे सुवर्णसंधी.
अन्न आणि पोषण सुरक्षा (Food and Nutrition Security) कडधान्य योजनेंतर्गत बीज प्रक्रिया (Seed Treatment) संचासाठी (Seed Treatment Setting Subsidy) अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा (Government Scheme) लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागेल.
बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीस प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजना सन 2024-25 या वर्षात बीज प्रक्रिया संच (Seed Treatment Setting Subsidy) प्राप्त लक्षांकाच्या अधीन राहून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल?
या योजनेसाठी (Seed Treatment Setting Subsidy) जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ पात्र असेल. लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी, संघ अनुदानाच्या लाभास पात्र राहील.
सदरील पात्र शेतकरी उत्पादक कंपनी, संघ तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज करण्यास पात्र राहतील. लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी, संघ अर्ज करताना ज्या कार्यक्षेत्रात कंपनी आहे, त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विहीत प्रपत्रात अर्ज सादर करावा लागेल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
- शेतकरी उत्पादक कंपनी, संघाचे लेटरहेडवर अर्ज
- शेतकरी उत्पादक कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, कमिटी ठराव, मागील तीन वर्षांचा बॅलेन्स शीट किंवा ऑडिट रिपोर्ट
- ज्या जागेवर बीज प्रक्रिया संच उभारणीचे नियोजन आहे त्या जागेचा सातबारा व आठ ‘अ’ चा उतारा जोडावा लागेल.
- शेतकर्यांनी एकत्रित येऊन केलेल्या कंपनीसही शासनाकडून अनुदान मिळणार आहे.
अंमलबजावणी प्रक्रिया
निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीस आवश्यक कागद पत्राची छाननीनंतर पूर्व संमती देण्यात येईल. पूर्व संमती मिळाल्यानंतर बीज प्रक्रिया संच उभारणीस कार्यारंभ आदेश दिला जाईल. निवड ते पूर्वसंमती व पूर्व संमती ते काम पूर्णत्व यासाठी ज्या आर्थिक वर्षात पूर्वसंमती देण्यात आलेली आहे त्याच आर्थिक वर्षात बीज प्रक्रिया संच प्रकल्प (Seed Treatment Setting Subsidy) पूर्ण होणे अपेक्षित आहे.
अर्ज करण्याची 31 तारखेची मुदत
शेतकरी उत्पादक कंपनी, संघ हे अर्ज 31 जुलै 2024 अखेर आपल्या कार्य क्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करू शकतील.