Solar Power Supply: महावितरणच्या ‘या’ नवीन प्रकल्पाद्वारे पिकांना देता येणार दिवसा पाणी; रोजगाराच्या सुद्धा निर्माण होतील संधी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीला दिवसा वीजपुरवठा (Solar Power Supply) करण्यासाठी राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची’ (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. यासाठी आवश्यक शासकिय जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात 900 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Power Supply) उभारण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

या प्रकल्पातून 170 उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येईल आणि उपकेंद्रांतील वीज वाहिन्यांद्वारा शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा (Solar Power Supply) करण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना पिकांना दिवसा पाणी (Day Time Crop Irrigation) देता येईल. अशी माहिती महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.

उपकेंद्राच्या परिसरातील हजारो शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा शाश्वत वीजपुरवठा (Solar Power Supply) होणार असल्याने वेगाने उभारण्यात येणार्‍या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना संबंधित गावांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाळे यांनी केले आहे.

ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Power Project) कार्यान्वित होतील त्या प्रत्येक ग्रामपंचायतींना पाच लाख प्रति वर्ष असे तीन वर्षांत 15 लाख रूपयांचे अनुदान मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

या योजनेत पश्चिम महाराष्ट्रातील 707 उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 5 हजार 877 मेगावॅट सौर वीज निर्मितीचे लक्ष्य असून, आतापर्यंत 5 हजार 344 एकर शासकिय जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

फायदा काय?
■ या योजनेतून शेतीला दिवसा वीज- पुरवठ्या सोबतच राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाला (Rural Economy) चालना मिळणार आहे.
■ विकेंद्रित पद्धतीने राज्यामध्ये अंदाजे 30 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होईल. विशेष म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, ती 25 वर्षे चालवणे आणि देखभाल व दुरूस्ती करणे याद्वारा ग्रामीण भागात अंदाजे 6 हजार पूर्णवेळ, तर 13 हजार अर्धवेळ रोजगार निर्माण (Employment Generation) होतील.
■ सौरऊर्जा प्रकल्प आस्थापित केले जातील, अशा ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) अंदाजे 200 कोटींपेक्षा जास्त अनुदान प्राप्त होऊन जन सुविधेची कामे होणार आहेत.

जिल्हा – उपकेंद्रांची संख्या – ऊर्जा निर्मिती
पुणे – 41 उपकेंद्र – 234 मेगावॅट
सातारा – 39 उपकेंद्र – 208 मेगावॅट
सांगली – 32 उपकेंद्र – 207 मेगावॅट
कोल्हापूर – 44 उपकेंद्र – 170 मेगावॅट
सोलापूर – 14 उपकेंद्र – 81 मेगावॅट
एकूण – 170 उपकेंद्र – 900 मेगावॅट

रोजगारासोबत ग्रामपंचायतीची कामेही होणार
या योजनेतून शेतीला दिवसा वीजपुरवठ्या (Solar Power Supply) सोबतच सोलापूरच्या ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे. या योजनेद्वारे विकेंद्रित पद्धतीने मोठी गुंतवणूक होत आहे. अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.