Spices Export: भारतीय मसाल्यावर नेपाळने घातली बंदी; जाणून घ्या कारण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय मसाल्यांवर (Spices Export) नेपाळ (Nepal) सरकारने बंदी घातलेली आहे.भारतीय मसाले (Indian Spices) हे जगभरात त्याच्या चवीमुळे आणि औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहेत. हे मसाले वेगवेगळ्या देशात निर्यात (Spices Export) होतात.

भारतीय मसाल्यात ‘एथिलिन ऑक्साइडचे’ (Ethylene Oxide) प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील 2 लोकप्रिय मसाला ब्रँड एव्हरेस्ट आणि एमडीएच (Spices Export) यांच्यावर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे.

याआधी सिंगापूर, हाँगकाँग आणि न्यूझीलंड या देशांनी या मसाल्यावर बंदी घातली आहे. या दोन ब्रँडमुळे भारतातील सर्वच मसाला निर्यातदार कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे भारताची मसाला निर्यात (Spices Export) 5% घटली आहे.

मसाले दीर्घकाळ टिकावेत यासाठी स्टरलायझेशन (MDH Masala) आणि एव्हरेस्ट मसाल्यांत  (Everest Masala) ईटीओचे (ETO) प्रमाण जास्त आढळल्यामुळे भारतीय मसाल्यांबाबत जगभरात प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे.

‘फेडरेशन ऑफ इंडियन स्पाइस स्टेक होल्डर्स’चे चेअरमन अश्विन नायक यांनी सांगितले की, भारतातून दरवर्षी चार अब्ज डॉलरचे मसाले निर्यात (Spices Export) होतात. मसाले सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वच देशांत ईटीओचा वापर केला जातो. मात्र त्याचे प्रमाण भिन्न असते.

ईटीओ हे मानवी प्रकृतीसाठी हानिकारक नाही. मुळात ईटीओ हे कीटकनाशक नाही. भारतीय मसाले निर्यात बोर्डाने यावर काही तरी पावले उचलायला हवीत. भारताचे मसाले 170 देशांत निर्यात होतात.

ब्रिटनमध्ये अतिरिक्त सतर्कता
ब्रिटनचे खाद्य नियामक ‘फूड स्टँडर्ड ऑथॉरिटी’ ने एक आदेश जारी करून भारतीय मसाल्यांची तपासणी वाढवली आहे. ब्रिटनमध्ये येणाऱ्या सर्व भारतीय मसाल्यांची आता कीटकनाशक अंश चाचणी केली जाईल.

कॅन्सरचा धोका?
नेपाळचे अन्न तंत्रज्ञान व गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी सांगितले की, एथिलिन ऑक्साइडमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर नेपाळ सरकारने सात दिवसांची बंदी घातली आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.