VNMKV News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, ‘खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनात होणार बियाण्यांची विक्री! जाणून घ्या माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या (VNMKV News) 52 व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवाद (Kharif Pik Parisanvad) व कृषि प्रदर्शनाचे (Agricultural Exhibition) आयोजन शनिवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 11.00 वाजता कृषि महाविद्यालय परभणी (VNMKV News) येथील सभागृहात करण्यात आले आहे.

परिसंवादात विद्यापीठ शास्त्रज्ञ विविध खरीप पीक लागवड (Kharif Crop) तंत्रज्ञान, सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, कडधान्य लागवड, भरड धान्याचे महत्व, कीड – रोग व्यवस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करणार असून शेतकरी बांधवाच्या व कृषिविषयक विविध शंकांचे निराकरण सुद्धा करण्यात येणार आहे.  

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ (VNMKV News) शास्त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका, शेतीभाती मासिकांचे विमोचन करण्यात येणार आहे.

सदर परिसंवादाचे थेट प्रक्षेपण https://www.youtube.com/@VNMKV  विद्यापीठ युट्युब चॅनेलवर करण्यात येणार आहे.

तरी परिसंवादाचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे  विस्तार शिक्षण संचालक यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला विद्यापीठ (VNMKV News) विकसित तंत्रज्ञान तसेच कंपन्यांच्या आणि बचत गटाचे साहित्याचे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ निर्मित‍ बियाणे विक्रीने होणार आहे.

विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व त्याचे दर (Biyane Vikri)

  • तूर: बीडीएन-716 (लाल), बीडीएन-711 (पांढरी), 6 किलोच्या बॅगमध्ये तर बीडीएन-13-41 गोदावरी (पांढरी) हे वाण 6 आणि 2 किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून प्रति किलो दर रू 250/- आहे.

बियाण्यांची उपलब्धता:  बीडीएन-716 – (800 बॅग), बीडीएन-711 – (366 बॅग), बीडीएन-13-41 गोदावरी 6 किलोच्या 700 बॅग व 2 किलोच्या 300 बॅग अशी आहे.

  • सोयाबीन: एमएयुएस-162, एमएयुएस-158, एमएयुएस-71, एमएयुएस-612 हे वाण 26 किलोच्या बॅगमध्ये तर एमएयुएस- 725 हा वाण 5 किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून सर्व वाणाचा प्रति किलो दर हा रू 100/- आहे.  

बियाण्यांची उपलब्धता: एमएयुएस-162 (1000 बॅग), एमएयुएस-158(1500 बॅग), एमएयुएस-71 (175 बॅग), एमएयुएस-612 (1000 बॅग) आणि एमएयुएस- 725 (1600 बॅग) अशी आहे.

  • ज्वारी: परभणी शक्ती हा वाण 4 किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून या वाणाचा प्रती किलो दर रु 125/- आहे व या वाणाच्या 300 बॅगची उपलब्धता आहे.
  • मूग: बीएम -2003-2 हा वाण 6 किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून या वाणाचा प्रती किलो दर रु 220/- आहे व या वाणाच्या 216 बॅगची उपलब्धता आहे.

बियाणे खरेदीसाठी रोख रक्कम स्वीकारण्यात येईल तसेच एका व्यक्तीस एक बियाणे बॅग याप्रमाणे विक्री करण्यात येईल.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.