Ploughing With Horse: वाशिमच्या शेतकऱ्याने केली घोड्याच्या साहाय्याने डवरणी, हजारोंचा खर्च वाचविला! 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सद्यस्थितीत शेतकरी डवरणीसाठी (Ploughing With Horse) अनेक जुगाडू यंत्राचा वापर करतात. मात्र वाशीम जिल्ह्यातील (Washim) एका शेतकऱ्याने चक्क घोड्याच्या साहाय्याने डवरणीचे काम (Ploughing With Horse) केले आहे. त्याचा हा प्रयोग चांगलाच चर्चेत आहे. 

वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वसारी येथील अल्पभूधारक शेतकरी पंढरी वाघमारे यांनी बैलांद्वारे डवरणीकरिता एकरी 800 ते 1000 रुपये येत असलेला खर्च पाहता आपल्याकडे असलेल्या घोड्याद्वारे डवरणी करण्याचे ठरविले. कारण, अनेक जण विविध क्लृप्ती लढवून डवरणी करीत आहेत. या शेतकऱ्याने चक्क घोड्याद्वारे डवरणी केली (Ploughing With Horse). 

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होण्यासाठी शेतात डवरणी केली जाते. यासाठी डवरा (Plough) हे उपकरण वापरले जाते. बैलांचे साहाय्याने (Ploughing With Bulls) हे चालविले जाते. यासाठी बैल कुशल असावे लागतात तसेच चालविणारा अनुभवी असावा लागतो, अन्यथा कोवळ्या पिकांचे नुकसान होऊ शकते.

या शेतकऱ्याने एक वर्षापूर्वी घोड्याची खरेदी केली होती. शेत डवरणीसाठी घोड्याचा वापर होऊ शकतो व खर्चही वाचतो म्हणून त्यांनी हा प्रयोग करून पाहीला. घोड्याद्वारे त्यांनी 4 एकर शेती डवरणी करून 3200 ते 4000 रुपयांची बचत केली आहे. त्यांनी केलेल्या या अफलातून प्रयोगाची परिसरात जोरदार चर्चाही रंगत आहे.

शेतीसाठी अनेक साधनांची (Agriculture Implements) आवश्यकता असते. यातही अनेक अवजारे ही महागडी असल्याने शेतकऱ्यांना परवडत नाहीत. यावर मात करत अनेक शेतकरी संबंधित शेतकामासाठी (Agriculture Work) जुगाडू (Agriculture Jugad) अवजारांची निर्मिती करत असतात. अशावेळी शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग खरच कौतुकास्पद आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.