world’s youngest professor: जगातील सर्वात तरुण शास्त्रज्ञ आणि प्रोफेसर ११ वर्षीय सोबोर्नो आइजैक बारी यांची परभणी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलास भेट  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जगातील सर्वात तरूण शास्त्रज्ञ आणि प्रोफेसर (world’s youngest professor) प्रा. सोबोर्नो आइजैक बारी यांनी १ जानेवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी  विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलास भेट दिली  यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणी यांनी त्यांचे स्वागत केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि परभणी ॲस्‍ट्रोनोमिकल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणा-या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल करिता मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याचे यावेळीप्रा. सोबोर्नो आइजैक बारी यांनी मान्य केले. यावेळी भविष्यातील विज्ञान प्रगतीबाबत कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणी यांनी तरूण शास्त्रज्ञ श्री सोबोर्नो आइजैक बारी (world’s youngest professor) यांचेशी चर्चा केली.  

प्राध्यापक सोबोर्नो आइजैक बारी हे जगातील सर्वात तरुण शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक (world’s youngest professor) असून आइजैक या नावाने त्यांना अमेरिकेत संबोधले जाते. त्याच्याकडे अमेरिकन नागरिकत्व आहे. २०१४ साली त्यांना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते ‘लेटर ऑफ रिकग्निशन’ (Letter of Recognition)प्रदान करण्यात आले. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते सोबोर्नो यांना ‘ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवॉर्ड’ देण्यात आले  आहे. प्रोफेसर सोबोर्नो इसाक बारी यांना विज्ञान आणि गणित विषयात आवड असून त्यात त्यांना विलक्षण ज्ञान आहे. त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता याच्या जोरावर त्यांनी वयाच्या फक्त चौथ्या वर्षी ‘द लव्ह’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी लिहिलेले दुसरे ‘मनिष’ नावाचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. २०१८ मध्ये, जेव्हा सोबोर्नो फक्त सहा वर्षांचा होता, तेव्हा हार्वर्ड विद्यापीठाने त्याला वैज्ञानिक म्हणून मान्यता दिली.

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलास भेट देताना प्रा. सोबोर्नो आइजैक बारी यांनी (world’s youngest professor) प्लॅनेटोरियम सोबतच जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयाच्या प्रयोगशाळा तसेच ७ डी थियेटर यांना  भेट देऊन पाहणी केले, अतिशय दर्जेदार पद्धतीचा हे विज्ञान संकुल होत असल्याचे सांगून याचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना आणि परभणीसाठी निश्चित होईल असं मत त्यांनी व्यक्त त्यांनी केले.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.