Micro Irrigation Scheme: राज्य सरकारने सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 200 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांसाठी (Micro Irrigation Scheme) एक आनंदाची बातमी आहे, राज्य सरकारने सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 200 कोटी रुपयांचे अनुदान (Micro Irrigation Subsidy) मंजूर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याचा प्रभावी वापर करून शेती उत्पादन (Agricultural Production) वाढवण्यास मदत होणार आहे.

काय आहे सूक्ष्म सिंचन योजना?
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन (Drip Irrigation)  सुविधा बसविण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यासाठी सुरु करण्यासाठी सुरु (Micro Irrigation Scheme) करण्यात आलेली योजना आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी 55 टक्क्यांपर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येते.

केंद्र आणि राज्य सरकारचा सहभाग
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत (Micro Irrigation Scheme) 75 टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडून व 25 टक्के राज्य शासनाकडून दिले जाते. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून निधी देत आहेत. केंद्र सरकारने या योजनेसाठी 120 कोटी 49 लाख रुपये आणि राज्य सरकारने 80 कोटी 32 लाख रुपये देत आहेत. एकूण 200 कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी मुंबई व मुंबई उपनगरे वगळून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजना राबविण्यात येते आहे.

या योजनेअंतर्गत (Micro Irrigation Scheme) जलद व पारदर्शक अंमलबजावणीकरिता कागदपत्रांची संख्या कमी ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाही.

शेतकऱ्यांसाठी ही योजना का महत्त्वाची आहे?
भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, पाणी कमतरतेमुळे शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहेत. सूक्ष्म सिंचन योजना शेतकऱ्यांना या समस्यांवर मात करण्यास मदत करेल. या योजनेमुळे शेतकरी अधिक उत्पादन घेऊ शकतील आणि त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारेल.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.