Farmers Suicide : शेतकरी आत्महत्येचं भूत पुन्हा मानगुटीवर ! 24 दिवसांत 80 हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी निसर्गाचा कोप कधी बाजारात नसलेला भाव यामुळे शेतकरी पिचला (farmers suicide) गेला आहे. शेतकरी आत्माहत्येचं भूत पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलय. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यानं विष प्रश्न करून आत्महत्या केली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चोपण या गावात ही घटना घडली आहे. गजानन उर्फ सुरेश खिरटकर असं मृत शेतकऱ्याचं नाव (farmers suicide) आहे. या शेतकऱ्याची 9 एकर शेती होती. शेतातील पिक अतिवृष्टीमुळे या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अखेर नैराश्यातून या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले.

80 हून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सरकारी घोषणा आणि सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत वास्तवात किती पोहोचली, यावरुनही अनेक सवाल विरोधकांकडून उपस्थित होत आहेत. अशातच नव्या सरकारच्या अवघ्या काही दिवसांची आकडेवारी पाहता शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्न महाराष्ट्र सरकार समोर आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या 24 दिवसांच्या कार्यकाळात 80 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तब्बल 89 शेतकऱ्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या 24 दिवसांत आत्महत्या केली असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आलेली होती. दरम्यान, आता यात यवतमाळमधीलही आणखी एका शेतकऱ्याची भर पडलीय.

सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात

विदर्भासोबत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी आहेत. मराठवाडा विभागातील 54 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर त्या खालोखाल यवतमाळमध्ये 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली होती. अशातच यवतमाळमधील आणकी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय.

संदर्भ : टीव्ही ९

Leave a Comment

error: Content is protected !!