Animal Husbandry : जनावरांच्या आहारात करा ‘या’ खनिजांचा वापर, काही दिवसांतच तुम्हाला जाणवेल मोठा बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Animal Husbandry) : सजीवांच्या जीवनातील महत्वाचा घटक हा आरोग्य असतो. मग तो मनुष्य असो की जनावर, आरोग्य टिकवण्यासाठी मनुष्य स्वतः पोषक तत्वे आहारात घेत असतो. एवढंच नाही तर त्याच्या आहारात खनिजांचा देखील समावेश केला जातो. मनुष्याप्रमाणे जनावरांच्या आरोग्याची निरोगी वाढ होण्यासाठी (Health Development) चिलेटेड खनिजांचा समावेश केला जातो. याच चिलेटेड खनिजांचे मॅक्रो आणि मायक्रो (Macro And Micro) हे दोन प्रकार पडतात. या दोन खनिजांमध्ये वर्गवारीता केली आहे. ती पुढीलप्रमाणे…

मॅक्रो खनिज आणि मायक्रो खनिज (Macro And Micro)

मॅक्रो खनिज (Macro) : मॅक्रो खनिजामध्ये १०० मिलिग्रॅमपेक्षा जास्त खनिजांचा समावेश असतो. यात कॅल्शिअम, फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅशिअम इत्यादी खनिजांचा समावेश केला आहे.

मायक्रो (Micro) : मायक्रो खनिजात झिंक, कोबाल्ट, मॅंगेनीज, कॉपर, आयर्न, आयोडीन, सेलेनिअम इत्यादी खनिजांचा समावेश होतो. सूक्ष्म खनिजांमध्ये प्रतिदिन १०० मिलिग्रॅमपेक्षा कमी खनिजांचा समावेश होतो. यापासून जनावरांना अधिकाधिक आरोग्य वाढीसाठी फायदा होतो. या खनिजांचा उपयोग खालीलप्रमाणे नमूद केला आहे. (Animal Husbandry)

चिलेटेड खनिजांचा उपयोग :
चिलेटेड खनिजांचा उपयोग हा जनावरांसाठी चांगल्या प्रकारे होत असतो. यामुळे गाई, म्हशी लवकर माजावर येणे, दुधाची वाढ होणे, गाभण राहणे, वासरांची वाढ होणे यासाठी चिलेटेड खनिजांचं महत्त्वाचं आहे. हे खनिज सजीवांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. जनावरांच्या उत्तम निरोगी वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी, गर्भाच्या वाढीसाठी खनिजांचा उपयोग होतो.

अशी करा घरबसल्या जनावरांची खरेदी विक्री

शेतकरी मित्रांनो आता जनावरांची खरेदी विक्री तुम्ही घरी बसूनही करू शकता. Hello Krushi मोबाईल अँप च्या मदतीने आता हव्या त्या जनावरांची कोणत्याही एजंटशिवाय खरेदी विक्री करता येणे शक्य झाले आहे. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचे लाभार्थी बना.