Tractor : ट्रेक्ट्रर ट्रोली रिव्हर्स स्पर्धेत कोणी मारली बाजी?

Tractor
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सध्या सर्वत्र यांत्रांचा माहोल आहे. राज्यात अनेक ठिकाणी गावांतील यांत्रांच्यानिमित्त विविध स्पर्धा भरवल्या जातात. यामध्ये काही ठिकाणी कुस्त्यांचे फड भरवण्यात येतात तर काही ठिकाणी बैलगाडा शैर्यतींचे आयोजन केले जाते. यासोबतच काही गावांत ट्रेक्टर (Tractor) ट्रोली रिव्हर्स स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये गावातील ट्रेक्टर चालवण्यात तरबेज असलेले बाजी मारतात.

पश्चिम सुपने (ता. कराड) येथे श्री. जोतिर्लिंग यात्रेनिमित्त ट्रॅक्टर-ट्रॉली रिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून उलटे धावणारे ट्रॅक्टर ट्रॉलीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. या स्पर्धेत अकुंश गायकवाड (पश्चिम सुपने) यांच्या टॅक्टर-ट्रॉलीने पहिल्या क्रमाकांचे 10 हजार 1 रूपये आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

या स्पर्धेत दुसरा क्रमांक ( 7 हजार 7 रूपये) लक्ष्मण देवळे (कागल, जि. कोल्हापूर), तिसरा क्रमांक (5 हजार 5 रूपये) युवराज कदम – बाबर (बाबरमाची, ता. कराड), चतुर्थ क्रमांक ( 3 हजार 3 रूपये) संदिप निंबाळकर (कागल, जि. कोल्हापूर), पाचवा क्रमांक (1 हजार 555) सिध्दार्थ पाटील (आणे, ता. कराड) यांनी रोख रक्कम व सन्मानचिन्ह पटकाविले.

विजेत्यांना रयत कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, चेअरमन हंबीरराव गायकवाड, रामचंद्र चव्हाण, प्रदिप गायकवाड, सदस्य ग्रामपंचायत हिम्मतराव थोरात, दिपक गायकवाड, प्रवीण थोरात, भिकाजी गायकवाड, उमेश गायकवाड आदीच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.