हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या २०२३ या वर्षात अवकाळी पाऊस Weather Update) राज्याच्या प्रत्येक भागात थांबून का होईना झाला आहे. परंतु या पावसाचा कोणताही नफा शेतकऱ्याला झाला नाही. अशातच परवा नाशिक आणि पुणे विभागात पावसाने जोरदार हजेरी लावली. आज (ता.१५) या दिवशी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Dept) वर्तवली आहे.
अवकाळी पाऊस तसेच वाढता उन्हाचा तडाखा यामुळे राज्यातील वातावरणात ताळमेळ पहायला मिळत नाही. यामुळे चंद्रपुरात काल तब्बल (ता.१४) या दिवशी ४३ अंशावर तापमान गेले. वर्ध्यात ४२ तर अमरावती नागपूर, सोलापुरात ४३ अंश सेल्सिअस तापमान होते.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपल्या गावातील हवामानाची माहिती मिळवा
शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. त्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi असे सर्च करा. त्यानंतर हिरव्या रंगाचे ॲप इंस्टॉल करा. त्या ॲपमध्ये आपल्या गावात आज किती पाऊस पडेल. तसेच आजचे नेमके हवामान काय आहे? कसे आहे? याबाबत या ॲपद्वारे माहिती मिळू शकते. यासह जमीन मोजणी, नकाशा मोजणी, शेतकरी दुकान, सातबारा उतारा, हि सर्व माहिती या ॲपद्वारे मिळू शकते.
खालील विभागातील शहरात येलो अलर्ट जारी :
- मध्य महाराष्ट्र : सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
- मराठवाडा : धाराशिव, लातूर.
- विदर्भ : अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा. या विभागात अवकाळी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.