हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) : यंदा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात हजेरी लावताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतीचे नुकसान केले. आता मे महिन्यातही अवकाळी पाऊस कायम राहणार काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यावर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्वाची बातमी दिली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज कसा मिळवावा?
शेतकरी मित्रांनो आता आपल्याला आपल्या गावात सोसाट्याचा वर, अवकाळी पाऊस होणार का याची माहिती एक दिवस अगोदरच मिळणे शक्य झाले आहे. हॅलो कृषी या मोबाईल अँपच्या मदतीने लाखो शेतकरी प्रगत शेती करून आपला नफा कित्तेक पटींनी वाढवत आहेत. तुम्हीसुद्धा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्या. इथे सातबारा उतारा, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, हवामान अंदाज, बाजारभाव अशा अनेक सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जातात.
आज ३० एप्रिल रोजी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. यामध्ये लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, सोलापूर, विदर्भ, व उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे. हवामान विभागानेही विदर्भात आज ढगाळ वातावरण राहील असे सांगितले असून वादळी वारे व पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. (Panjabrao Dakh Havaman Andaj)
१-२ मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता?
पुढील महिन्यात १ अन २ तारखेला राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस होण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे.
३ मे पर्यंत पावसाचे प्रमाण कमी होणार?
राज्यात ३ मे रोजी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. परंतु ५,६,७ मे रोजी पुन्हा राज्यात पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस कायम राहणार असल्याचे यावरून दिसत आहे.
९ मे ते १६ मे राज्यात उन्हाची तीव्रता वाढणार?
मागील ३० दिवसांपासून सतत पडणारा पाऊस ९ मे ते १६ मे दरम्यान रजेवर जाणार आहे. राज्यात ९ ते १६ मे दरम्यान उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी आपली शेतातील कामे वेळीच उरकून घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा काढून झाकून ठेवावा असा सल्ला पंजाबराव डंख यांनी दिला आहे. (Panjabrao Dakh Havaman Andaj)
आज कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार?
अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच भंडारा गोंदिया, नागपूर, चंद्रपूर येथे अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती येथे निर्जन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर यांनी वर्तवली आहे.