Agricultural Mechanization : कृषी यांत्रिकीकरणातून 32 कोटी वितरीत; अधीक्षक फरांदे यांची माहिती

Agricultural Mechanization
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेती व्यवसायात यांत्रिकीकरण हा मुद्दा अधिकाधिक महत्वाचा आहे. सध्या पारंपरिक शेतीसह यांत्रिकीकरणाला अधिकाधिक प्राधान्य दिलं जातं. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये कृषी अवजारांसाठी ६ हजार २२९ शेतकऱ्यांना सुमारे ३२ कोटी ६३ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक फरांदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अधीक्षक फरांदे म्हणाल्या की, ट्रॅक्टर- ५९० लाभार्थ्यांना ७ कोटी २६ लाख, पॉवर टिलर- २९९ लाभार्थ्यांना २ कोटी ५० लाख, इतर कृषी अवजारे जसे की,रोटावेटर, पेरणी यंत्र, पल्टी नांगर, मळणी यंत्र, चाफ कटर ही यंत्रे ५ हजार ३१६ लाभार्थ्यांना २१ कोटी ७७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. भाडेतत्त्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवेसाठी २४ लाभार्थ्यांना १ कोटी १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी यंदा ४३ कोटी एवढा खर्च करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. यामुळे शेतकऱ्यांनी विविध अवजारांचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने सांगितलं आहे. तसेच या योजनेद्वारे एकूण उपकरणातून लागणारा खर्च हा पुढे नमूद केला आहे.

उपकरणातून लागणारा खर्च पुढीलप्रमाणे :

ट्रॅक्टर – १.२५ लाख, पॉवर टिलर ८५ हजार, रिपर कम बाइंडर २.५ लाख, रोटाव्हेटर ५० हजार, पल्टी नांगर ८९ हजार ५००, मिनी डाळ मिल १.५० लाख, मिलेट मिल ५.४० लाख,चाफकटर ६ हजार ३०० रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे.