Fertilizer Seeds Complaints : आपल्याकडे बरेच जण शेती हा व्यवसाय करतात. मात्र सध्या शेतकरी (Farmer ) शेती करत असताना सेंद्रिय पिके घेण्याऐवजी जास्तीत जास्त रासायनिक पिके घेतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. अगदी कमी वेळामध्ये भरघोस उत्पन्न निघते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. मात्र आता यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. खते, कीटकनाशके, बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना अनेक वेळा बोगस बियाणे देऊन फसवणूक केली जाते
शेतकऱ्यांना आपली फसवणूक झालेले लक्षात आले तरी कोणताही शेतकरी कोणतीही तक्रार दाखल करत नव्हता. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी समोर आली आहे. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना झालेल्या फसवणुकीची तक्रार आता सहज करता येणार आहे. त्याचबरोबर ही तक्रार गोपनीय पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे या बातमीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी आता बिनधास्तपणे त्यांची तक्रार करू शकतात. (Fertilizer Seeds Complaints)
मागच्या काही दिवसापूर्वी राज्याचे नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीची तक्रार थेट मोबाईल वरून करता येणार असल्याची घोषणा केली होती. आता या संदर्भात शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी राज्य सरकारमार्फत एक व्हाट्सअप क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे 9822446655 असा हा व्हाट्सअप नंबर आहे.
सरकारने दिलेल्या या व्हाट्सअप नंबर वर शेतकरी आता एकदम सहजरित्या तक्रार करू शकतात. त्याचबरोबर यावरून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव देखील गोपनीय ठेवले जाणार आहे. दरम्यान ही सेवा 24 तास सुरू राहणार आहे. आमचे hello krushi चे अँप ऑनलोड करा आणि कृषीविषयक सर्व माहिती मिळवा एकदम झटक्यात. त्यामुळे शेतकरी असाल तर लगेचच Hello Krushi हे अँप मोबाईलमध्ये इंस्टाल करा.