Solar Trolley : हे यंत्र आहे शेतकऱ्याच्या अतिशय फायद्याचं; तुम्हाला अजून या ट्रॉलीबाबत माहिती नाही?

Solar Trolley
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Solar Trolley : शेती करायची म्हंटली की त्यासाठी वीज लागतेच मात्र आजही काही गावांमध्ये वीज नाही. यामुळे, लोक त्यांच्या शेतात काम करण्यासाठी मशीन वापरू शकत नाहीत त्याचबरोबर नवनवीन सिंचन देखील वापरू शकत नाहीत. त्यामुळे लोकांना डिझेल वरील उपकरणे वापरावी लागत आहेत. मात्र डिझेल आणि विजेच्या वाढत्या किमती आणि विजेचा तुटवडा शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक समस्या बनत आहे.

सर्वात कमी किंमतीत शेती उपकरणे विकत घेण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा

सोलर ट्रॉली नेमकी काय आहे?

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी शेतकरी सोलर ट्रॉलीच्या स्वरूपात अद्ययावत ऊर्जा वापरत आहेत. सोलर ट्रॉली हे एक प्रकारचे तांत्रिक उपकरण आहे ज्यामध्ये पॅनेल बसवलेले असतात, ते शेतीच्या कामांसाठी योग्य वीज निर्माण करू शकते. यासोबतच सोलर ट्रॉलीही सहज शेतापर्यंत नेता येते. या उपकरणाच्या मदतीने शेतकरी आपली शेतीची कामे सहज करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो.

शेतकरी मित्रानो सोलर ट्रॉलीबद्दल अधिक माहिती जाऊन घेण्याआधी आमच्या Hello Krushi अँप बद्दल देखील माहिती जाणून घ्या. यामध्ये तुम्हाला सर्व सरकारी योजनांची अगदी मोफत माहिती मिळत आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात. अर्ज नेमका कसा करायचा? या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.

जाणून घ्या सोलर ट्रॉलीचे फायदे –

सोलर ट्रॉलीचा (Solar Trolley ) सर्वात मोठा फायदा म्हणजे, ती तुम्ही शेतात नेऊन शेतीशी संबंधित कामे सहज करू शकता. त्याचबरोबर, शेतकरी शेताच्या सिंचनासाठी सोलर ट्रॉली एका शेतातून दुसऱ्या शेतात नेऊ शकतात. याशिवाय शेतकरी सोलर ट्रॉलीचा वापर त्यांच्या घरातील कामांसाठी करू शकतात. यामुळे ट्रॉली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते.

5HP, 3 Phase Solar AC Water Pump Price - बिना बिजली फ्री में होगी खेतों की सिंचाई [Solar Trolley]

सोलर ट्रॉलीच्या साहाय्याने शेतकरी वीज निर्माण करू शकतात आणि ती त्यांच्या शेतात वापरू शकतात. त्यामुळे शेतकर्‍यांना विजेसाठी तासन्तास थांबावे लागणार नाही, तर डिझेलवरील खर्चातूनही सुटका होणार आहे. याशिवाय सोलर ट्रॉलीच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेतीची कामे तर करू शकताच, शिवाय इतर शेतकऱ्यांना भाड्याने देऊनही चांगले पैसे देखील कमवू शकता.

आता तुम्ही देखील सोलर ट्रॉली खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही लूम सोलरच्या अधिकृत वेबसाइट www.loomsolar.com वर जाऊन खरेदी करू शकता. लूम सोलर कंपनीचा कॉल नंबर 8750778800 किंवा व्हॉट्सअॅप नंबर 8750778800 वर संपर्क साधून संबंधित माहिती मिळवू शकता.

ट्रॉली सोलर पंपाचे वैशिष्ट्ये

1-हा ट्रॉली सोलरपंपाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे की हा पंपा कोणत्याही ठिकाणी सहजतेने लावला जाऊ शकतो.
2- शेतकरी या सोलर पंपाला सहजतेने घरी नेऊ शकतात तसेच सहजतेने शेतात देखील नेऊ शकता.
3-या ट्रॉली सोलर पंप आला डिझेल किंवा विजेची आवश्यकता नाही.
4-जेव्हाशेतात गरज नसेल तेव्हा घरी सौरऊर्जेपासून वीज तयार केली जाते.
5- घराशिवाय जिकडे आवश्यकता असेल तिकडे याचा प्रयोग केला जाऊ शकतो.
6-शेतकरी याला भाड्याने देऊ देखील चांगला नफा कमवू शकतात.