Pashu Shed Yojna : अनेकजण पशुपालन व्यवसाय (Animal husbandry business) करत आहेत. पशुपालन करताना सर्वात महत्वाचं म्हणजे पशूंचे शेड असते. त्यामुळे आज आपण पशू शेड योजनेचे ऑनलाइन अर्ज, नोंदणी फॉर्मची पात्रता आणि लाभांविषयी माहिती पाहणार आहोत. पशुपालनादरम्यान अनेक प्रकारच्या समस्या पशुपालकांसमोर येतात आणि काही पशुपालकांना त्यांची जनावरे विकावी लागतात हे तुम्हाला माहीत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही अॅनिमल शेड स्कीम 2023 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकता. चलातर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया
नेमकी काय आहे शेड योजना?
पशु शेड योजना भारत सरकारने देशातील 4 राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये लागू केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पाहता लवकरच देशातील इतर राज्यांमध्येही त्याची अंमलबजावणी होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे तीन जनावरे आहेत त्यांना या योजनेअंतर्गत ₹75000 ते ₹80000 पर्यंत मदत दिली जाते. (Pashu Shed Yojna)
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पशु शेड योजना किंवा अन्य सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच मोबाईल मध्ये Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही शेती संबंधित योजनेसाठी थेट अर्ज करता येत आहे. यासाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.
पशुशेड योजना 2023 गोठा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किमान 2 जनावरे असणे बंधनकारक आहे, तुमच्याकडे 2 जनावरे असल्यास गोठा बांधण्यासाठी सरकार तुम्हाला 75000 रुपयांची मदत करेल. जर तुमच्याकडे 4 जनावरे असतील तर तुम्हाला 1.60 लाख रुपये दिले जातील.
या योजनेचे उद्दिष्टय काय?
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि जनावरांसाठी योग्य घरे उपलब्ध करून देणे हा शासनामार्फत मनरेगा गोठा योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे. जर शेतकरी जनावरांची योग्य काळजी घेऊ शकले तर साहजिकच त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच त्यांचे राहणीमान सुधारेल.