Business Ideas : गावातच ‘हे’ व्यवसाय करून तुम्ही महिन्याला कमवू शकता लाखो रुपये, शहरातल्या बेरोजगारांनाही ठेवाल हाताखाली कामाला, पहा कसे सुरु करायचे?

Best Small Business Ideas for Rural Areas
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Business Ideas for Rural Areas : सध्या व्यवसाय क्षेत्रात अनेक नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. पूर्वी व्यवसाय म्हटलं कि खूप जास्त पैसे लागायचे. मात्र आता तुम्ही अगदी कमी पैशांमध्येही मोठा व्यवसाय उभा करण्याचे स्वप्न पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमचं डोकं अन मेहनत यांची गुंतवणूक करावी लागेल. इंटरनेटमुळे आता अनेक कामं तुम्ही जगातील कोणत्याही कोपऱ्यात बसून करू शकता. तसेच ग्रामीण भागातही यामुळे अनेक व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला आशाच पाच व्यवसायांबाबत माहिती सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या गावात राहून करू शकता. तसाच महिन्याला लाखोंची कमाई असणाऱ्या या व्यवसायामध्ये तुम्ही शहरातील लोकांना हाताखाली कामाला ठेवावे लागू शकते.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

Organic farming

सध्या प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अतिशय संवेदनशील झाले आहेत. आपल्या चांगलं अन्न भेटावं यासाठी माणूस कितीही रक्कम मोजायला तयार आहे. मात्र चांगल्या गुणवत्ता पूर्ण अन्नाचा पुरवठा कमी असल्याने अशा ऑरगॅनिक शेतमालाला मोठा भाव मिळतोय. तुम्ही तुमच्या गावातील काहि शेतकऱ्यांना सोबत घेऊन एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरु करून व्यवसायाची सुरवात करू शकता. यानंतर जवळच्या शहरात ऑरगॅनिक शेतमाल पोहोचवण्यासाठी तुम्हाला शहरातील काही लोकांना मार्केटिंगसाठी कमला ठेवावे लागेल. तुम्ही यामध्ये सातत्य ठेवले तर नक्कीच यामधून तुम्हाला चांगला नफा मिळेल.

Dairy Business (दुग्धव्यवसाय)

दूध हि एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला दैनंदिन आयुष्यात अतिशय महत्वाची आहे. सकाळी उठल्याउठल्या लागणाऱ्या चहा पासून ते आइस्क्रीम, श्रीखंड अशा अनेक खाद्यपदार्ध बनवण्यासाठी दूध लागते. अलीकडे पिशवीतले दूध घेण्याऐवजी घरगुती किंवा थेट गावातून येणारे दूध घेण्याकडे लोकांचा कल आहे. तुम्ही जर तुमच्या गावातील दूध गोळा करून जवळच्या शहरांत विक्री केले तर लोक तुम्हाला चालू दरापेक्षा १० रुपये जास्त देतील मात्र तुमचंच दुष्ट घेणं पसंद करतील. कारण तुमच्याकडे जे दूध मिळणार आहे ते कोणतीच कंपनी त्यांना देऊ शकणार नाही.

Water Supply

ग्रामीण भागात अनेकदा पाण्याची कमतरता जाणवत असते. तसेच शुद्ध पाणी हि लोकांची आवश्यकता बनली आहे. कोरोना नंतर प्रत्येकजण आपल्या आरोग्याची बारकाईने काजळी घेतो. तेव्हा तुम्ही जर गावामध्ये पाण्याचा प्लांट उभा केला आणि डबल फिल्टर पाण्याचे जार लोकांना घरपोच किंवा गावातील दुकानदार यांना घरपोच देण्याची सेवा सुरु केली तर तुम्हाला यामधून चांगले पैसे कमावण्याची संधी आहे. लग्नकार्य, मयत, वाढदिवस अशा कारणांसाठी ग्रामीण भागात मोठ्या संख्येने लोक जमत असतात. परंतु अनेकदा पाण्याची सोया करताना लोकांना नाकीनऊ येतो. तेव्हा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन

मधमाशी पालन

मधमाशी पालन मध, मेण, परागकण, प्रोपोलिस, रॉयल जेली आणि विष यांसारखी अनेक उत्पादने प्रदान करते. हा व्यवसाय अनेकांनी शेतकऱ्यांसाठी खुला केला आहे. बरेच शेतकरी सध्या हा व्यवसाय करताना दिसतात. छोट्या गुंतवणुकीतही तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. (Agricultural Business)

मत्स्यव्यवसाय

सध्या मासेमारी हा व्यवसाय तेजीत आहे. मासेमारी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आवश्यक परवाने मिळवण्याबरोबरच बोटी, जाळी आणि उपकरणे यामध्ये गुंतवणूक करावी लागते. मात्र यामधून नफा देखील चांगला मिळतो म्हणून या व्यवसायातून तुम्ही देखील चांगले पैसे कमावू शकता.

बागकाम

फलोत्पादन उद्योगामध्ये फळे, भाजीपाला आणि फुले यांची लागवड समाविष्ट आहे. त्याच्या वाढत्या मागणीमुळे, या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. फलोत्पादनात स्वारस्य असलेल्या उद्योजकांनी त्यांच्या क्षेत्रासाठी आणि बाजारपेठेसाठी योग्य पिके निवडण्याबरोबरच जमीन, सिंचन आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. असे केल्यास चांगला फायदा होईल