Cultivation of Dragon Fruit : शेतकरी सध्या शेतीत नवनवीन प्रयोग करीत उत्पादन घेताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून पूर्वीपेक्षा जास्त पैसे देखील कमावता येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी सरकार देखील अनुदान देत आहे. त्यामुळे शेतकरी देखील अनेक नवनवीन प्रयोग करत शेती करत आहेत. तरुणवर्ग देखील नवनवीन प्रयोगासह शेतीमध्ये विविध फळ पिकांची लागवड करत आहेत. यामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडीकडे देखील तरुणांचा कल वाढत चालला आहेत.
जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेण्यास सुरू केली सुरुवात केली आहे. या फळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. अनेक आजारावर आणि त्वचेसाठी गुणकारी असल्याने याला मोठी मागणी असून शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करत असल्याचे दिसत आहेत. त्याचबरोबर ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांना सरकार देखील अनुदान देत आहे. त्यामुळे अनेकजण याची लागवड करत आहेत तुम्हाला जर यासाठी अनुदान मिळवायचे असेल तर तुम्ही देखील अनुदान मिळू शकतात.
सरकार देते ड्रॅगन फ्रुटसाठी अनुदान
कोणत्याही गोष्टीसाठी अनुदान मिळाले तर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते आणि त्यातून शेतकऱ्यांना नवनवीन प्रयॊग शेतीत करण्याचा उत्साह वाढतो. याच गोष्टीचा विचार करून राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी साठी अनुदान देत आहे . राज्य सरकार मार्फत एक हेक्टरवर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट लागवड करायची असेल तर चार लाख रुपयांचा खर्च निश्चित केला आहे. त्यापैकी 40 टक्के रक्कम म्हणजेच १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
टप्प्याटप्प्यांमध्ये मिळते अनुदान
तुम्हाला जर ड्रॅगन फूडसाठी अनुदान मिळवायचे असेल तर तुम्हाला सरकारच्या महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज दाखल करावा लागेल. हा अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हाला यासाठी अनुदान मिळेल मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच वेळी अनुदान न देता तीन टप्प्यात अनुदान दिले जाते त्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची मालकीची किमान 0.20 हेक्टरी जमीन असावी.
कोण कोणत्या कामांसाठी मिळते अनुदान
या फळाच्या लागवडीकरिता आवश्यक असणारे खड्ड्यांची खुदाई, खांबावर प्लेट लावणे, आवश्यक असणारे सिमेंट काँक्रीटचे खांब उभारणे त्याचबरोबर रो[रोपांची लागवड करणे, ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षण यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे.