Maharastra Rain : दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत – शेतकऱ्यांची मागणी

Maharastra Rain
Maharastra Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharastra Rain : सध्या राज्यभर पावसाने विश्रांती घेतली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील अजूनही म्हणावा असा पाऊस पडला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी खरिपाची पिके नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. याच कारणामुळे आता शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली आहे. दरम्यान मंगळवेढा तालुक्यात देखील पावसाने दडी मारल्याने त्या ठिकाणी पाण्याची परिस्थिती अतिशय भीषण आहे. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळ जाहीर करून जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो सुरू करावेत अशी मागणी तेथील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत कृषी भूषण अंकुश पडवळे यांच्या सहशिष्ट मंडळाने नायब तहसीलदार पी व्ही सागर यांच्याकडे मागणी केली आहे.

मंगळवेढा तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामात पेरणी केलेले बाजरी, तूर, मका, हुलगे, सूर्यफूल, सोयाबीन, मटकी, यासह फळबागा पाण्याअभावी करपून जात असल्याची त्या ठिकाणी स्थिती आहेत. विहिरी बोरवेल देखील कोरडे पडले आहेत. बरेच शेतकरी फळबागा आणि पिके जगवण्यासाठी टॅंकरने पाणी घालत आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या गावात कधी पाऊस पडणार याबाबतची माहिती जाणून घ्यायची असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही रोजच्या रोज ताजा हवामान अंदाज पाहू शकता. त्याचबरोबर तुमच्या गावात, तुमच्या भागात तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस? पडणार याबाबतची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल त्यामुळे. शेतकरी असाल तर लगेचच प्लॅस्टर वर जाऊन आपले Hello Krushi हे अँप इंस्टॉल करा.

दूध उत्पादक आर्थिक संकटात

पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडले आहेत. मंगळवेढा तालुक्यामध्ये चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना चार हजार रुपये प्रमाणे चार विकत घेऊन जनावरांना घालावा लागत आहे. एकीकडे दुधाचे कमी झालेले रेट आणि त्यामुळे उत्पादन खर्च एवढा सुद्धा दुधाला दर मिळत नाही/ त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. जनावरांना खाण्यासाठी चारा कुठून आणावा त्यासाठी पैसे कुठून आणावेत असा मोठा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर पडला आहे.