Punganur Cow : भारतात प्राचीन काळापासून घरोघरी गाय पाळण्याची प्रथा आहे. पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या दावणीला देशी जनावरे जास्त तितकी त्या शेतकऱ्याची श्रीमंती जास्त असे समजले जायचे. परंतु काळ बदलला तसा दावणीच्या देशी जनावरांची जागा संकरित गायींनी घेतली. संकरित गाईंच्या तुलनेत देशी गाईंचे दूध देण्याचे प्रमाण कमी आहे. सहाजिकच देशी गाईंचा खर्च परवडणारा नसल्याने आपसूकच देशी गाईंची संख्या कमी होत गेली. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात कमी उंचीच्या अन फक्त भारतात सापडणाऱ्या एका विशेष गाईबाबत माहिती सांगणार आहोत. या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे या गाईचं दूध पौष्टिक अन म्हशीच्या दुधासारख घट्ट असते.
भारताचे वैभव असणाऱ्या अशाच काही देशी गाईंच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात गाईंच्या अनेक जाती पाहायला मिळतात. पुंगनुर ही अडीच ते तीन फुट उंचीची गाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तिच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पुंगनुर जातीची प्रजाती आंध्र प्रदेशातील चित्तुर जिल्ह्यात आढळते. येथील पुंगनुर नावाच्या गावानेच या गाईच्या प्रजातीला ओळख आहे. आंध्रप्रदेशात या गाईच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
गावाच्या नावानं या गाईच्या प्रजातीला ओळख प्राप्त झाली आहे. तिच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी गोदावरी जिल्ह्यातील लिंगमपट्टी येथील गोआश्रमामध्ये या गाईच्या संवर्धनाचे काम केले जात आहे. येथील गोशाळेत तीनशेहून अधिक पुंगनुर जातीच्या गाई आहेत. यामध्ये त्यांच्या चारा-पाणी, निवारा तसेच आरोग्याच्या बाबतीतही काळजी घेतली जाते.
या गाईची उंची अडीच ते तीन फूट असते. तर या गाईच्या नवजात वासराची उंची अवघी १६ ते २२ इंच इतकी असते. म्हणूनच या गाईला जगातील सर्वात कमी उंचीची गाय म्हटले जाते. या गाईची उंची जरी कमी असली तरी दिवसाला तीन ते पाच लिटर दूध देते. तसेच या गाईचे दूध औषधी समजले जाते. अशा नामशेष होण्याच्या मार्गावर असणार्या गाईच्या संवर्धनासाठी व्यापक मोहीम राबविणे गरजेचे आहे.
पुंगनूर गाय किती रुपयांना मिळते? (punganur cow price)
सध्या देशभरात पुंगनूर गायचे पालन वाढले आहे. आकाराने लहान अन खुराक कमी असल्याने शहरातही अनेकजण या गायीचं पालन करत आहेत. घरच्याघरी देशी गायीचं दूध मिळत असल्याने पुंगनूर गायीला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. महाराष्ट्रात पुंगनूर गाई साधारणपणे ३० हजार ते १ लाख रुपये किमतीला बाजारात मिळते. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपवरून सुद्धा जनावरांची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी विक्री करू शकता.