Agriculture news : पाईपलाईनचे लिकेज काढण्यासाठी वापर ‘ही’ सोपी पद्धत, 5 मिनिटात होईल काम; वाचा संपूर्ण माहिती

Agriculture News
Agriculture News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture news : देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. योग्य नियोजन आणि बाजाराचा संपूर्ण अभ्यास केला तर शेतीतून चांगले उत्पादन घेता येते. शेतीला पाणी देण्यासाठी पाईपलाईन गरजेची असते. परंतु अनेकदा पाईपलाईन फुटते. अशावेळी दुरुस्तीसाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. परंतु जर तुम्ही काही सोपी पद्धत फॉलो केली तर या समस्येतून तुमची सुटका होऊ शकते.

‘ही’ पद्धत वापरा

अनेकजण पाईपलाईनचा लीक काढण्यासाठी दोन्ही बाजूला साधारणतः पाच पाच फूट खोल जागा उकरतात. परंतु आता तसे न करता फक्त दोन दोन फूट म्हणजे एकूण चार फूट जागा उकरून घ्या. समजा तुमची पाईपलाईन फक्त दोन इंची असेल तर दोन इंचीचे सॉकेट घ्या, पाईपलाईन तीन इंचीची असेल तर तीन इंची सॉकेट घ्या. लीक झाल्याच्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर पाईप कापून घ्या.

क्विक फिक्स सॉकेटमध्ये एक छोटा पाईपचा तुकडा टाका. असे करण्यापूर्वी या सॉकेटच्या एका तोंडाला शाम्पू लावा. सॉकेटच्या रबरावर देखील शाम्पू लावा. पाईपचा तुकडा सॉकेटमध्ये टाकण्यापूर्वी त्यालाही शाम्पू लावा. सॉकेटमध्ये टाकलेल्या पाईपच्या एका तोंडाला सोल्युशन लावा. आता जो काही लिक झालेला पाईप आहे त्याच्या दुसऱ्या ठिकाणी पाईप कापून घ्यावा.

लक्षात ठेवा ही गोष्ट

पुढे हे सॉकेट एका बाजूने त्या पाईपवर व्यवस्थित चढवून घ्या. सॉकेटच्या एका बाजूला सोल्युशन लावून घ्यावे, सोलुशन असलेली सॉकेटची बाजू ओढून ती लिकेज झालेल्या पाईपच्या एका तोंडामध्ये व्यवस्थित टाका. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या बाजूने पाण्याचा प्रवाह येईल त्या बाजूला क्विक फिक्स सॉकेटचे मोठी बाजू फिट करावी. अशा प्रकारे तुम्हाला अवघ्या पाच मिनिटांत लिकेज काढता येईल.