Fish Farming : गोड्या पाण्यातील मस्त्यशेतीत ‘हे’ राज्य ठरले अव्वल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी गोड्या पाण्यातील मस्त्यशेती (Fish Farming) करतात. महाराष्ट्र सरकारकडून मस्त्यशेती उद्योगाला अनुदानही उपलब्ध करून दिले जाते. मात्र आता उत्तरप्रदेश या राज्याने गोड्या पाण्यातील मस्त्यशेती (Fish Farming) करण्यात अव्वल क्रमांक पटकावला असल्याचे समोर आले आहे. जागतिक मस्त्यपालन दिनाचे (21 नोव्हेंबर) अवचित्त साधून केंद्रीय मस्त्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

21 व 22 नोव्हेंबर रोजी जागतिक मस्त्यपालन दिनाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे आयोजित ‘ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया- 2023’ या कार्यक्रमात याबाबत उत्तरप्रदेशला सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती योगी सरकारमधील मत्स्यविकास मंत्री डॉ. संजय कुमार निषाद यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नांमुळे उत्तरप्रदेशात मागील साडे सहा वर्षात मस्त्य उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्य देशात मस्त्यशेती करण्यात अव्वल ठरले आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

३१ प्रकल्प कार्यान्वित (Fish Farming In India)

यावर्षी उत्तरप्रदेशात 9,15 लाख मेट्रिक टन मस्त्य उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी 8.09 लाख मेट्रिक टन नोंदवले गेले होते. याशिवाय यावर्षी उत्तरप्रदेशात 36 हजार 187 लाख मेट्रिक टन मस्त्यबीज उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी 27 हजार 128 लाख मेट्रिक टन इतके नोंदवले गेले होते. याशिवाय उत्तरप्रदेशात पंतप्रधान मस्त संपदा योजनेअंतर्गत 31 प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. यासाठी केंद्राकडून आतापर्यंत 15 हजार 282 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच उत्तरप्रदेशात आतापर्यंत 1 लाख 16 हजार मस्त्य उत्पादक शेतकऱ्यांना मस्त्य विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. असेही निषाद यांनी यावेळी म्हटले आहे.

उत्तरप्रदेशला मस्त्य शेतीचे हब बनवण्यासाठी योगी सरकारचे प्रयत्न सुरु असून, त्याद्वारे उत्तरप्रदेशातील चंदौली येथे 62 कोटी रुपयांचा ‘अल्ट्रा मॉडर्न फिश मॉल’ उभारण्यात येणार आहे. उत्तरप्रदेशात योगी सरकारकडून यावर्षी 14 हजार मस्त्य शेतकऱ्यांना 10 हजार 772 कोटींचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय सरकारकडून अनेक शेतकऱ्यांना मस्त्य शेती करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. असेही निषाद यांनी यावेळी म्हटले आहे.

Gorakshnath Thakare
सकाळ, ABP माझा, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. शेती क्षेत्रात विशेष रस असून शेतमाल प्रक्रिया उद्योग, बाजारभाव, वायदेबाजार, तंत्रज्ञान आदी विषयांची आवड आहे.