प. बंगाल व अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सूनच्या हजेरीचा अंदाज

Rain Paus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | तोक्ते चक्रीवादळ काही दिवसापूर्वी घेऊन गेल्यानंतर यंदाच्या मान्सून आगमनाबद्दल बरेच तर्कवितर्क केले जात होते. मानसून लांबेल का अशीही भीती वर्तवली जात होती. पण अंदमान- निकोबार येथे दक्षिण पश्चिम मान्सून दाखल झाला आहे. व लवकरच मुख्य भूभागात मान्सून पोहोचण्याचे संकेत भारतीय हवामान विज्ञान विभाग यांनी दिले आहेत.

भारतातील मान्सूनबाबत माहिती देताना भारतीय हवामान विज्ञान विभागाने असे सांगितले की, 21 मे रोजी नेऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोहचला आहे. या भागातील अंदमान निकोबार बेटे आणि संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र सोबतच, उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दक्षिण पश्चिम मानसून आला आहे. तसेच, लवकरच देशाच्या इतर भागांमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज संगीतला आहे.

 

यासोबतच, माहिती देताना हवामान विभागाने असेही सांगितले की, अंदबार- निकोबारमध्ये मान्सून पोहोचल्यामुळे यावेळी, केरळमध्ये मान्सून 31 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे. दरवर्षी अंदमानच्या समुद्रात साधारण 20 ते 21 मे दरम्यान मोसमी वाऱ्याचे आगमन होते. ते मोसमी वारे नंतर केरळमध्ये दाखल होतात. त्यामुळे, महाराष्ट्रातही या वेळी मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

https://chat.whatsapp.com/KzJiHgVregE3FOlwpDTyW