Mother Dairy Takes Over Mahanand: शेवटी महानंदचे हस्तांतरण मदर डेअरीकडे; पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकार करणार 253 कोटीची मदत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महानंदचा ताबा गुजरातमधील मदर डेअरीकडे (Mother Dairy Takes Over Mahanand) 2 मे 2024 रोजी हस्तांतरित करण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (Mahanand) आता इतिहासजमा झाला आहे. महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) 253 कोटी रुपयांची मदत करणार आहे.

महानंदची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यानंतर राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (NDDB) मदर डेअरीला (Mother Dairy) संस्था चालवण्याची जबाबदारी दिली होती. महानंद ही राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था होती आणि 1967 मध्ये स्थापन झाली होती. 2004 पर्यंत संस्था नफ्यात होती, परंतु त्यानंतर अनेक दूध संघांनी स्वतःचे ब्रँड (Milk Brand) बनवून दूध विक्री सुरू केल्याने महानंदची घसरण सुरू झाली (Mother Dairy Takes Over Mahanand).

2016 मध्ये, महानंद बंद होण्याच्या मार्गावर पोहोचली होती. यानंतर NDDB मध्ये हस्तांतरणाचा प्रस्ताव आला आणि फेब्रुवारी 2024 मध्ये संचालक मंडळाने राजीनामा दिला.

राज्य सरकार आणि NDDB यांनी मिळून 253.57 कोटी रुपयांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम तयार केला आहे. यातून महानंदचे आधुनिकीकरण आणि क्षमता वाढवण्यात येईल.

महानंदच्या हस्तांतरणावरून राज्यात वाद-विवादही झाले होते. काही लोकांनी असा दावा केला की हे महाराष्ट्राच्या (Maharashtra) हितसंबंधांविरोधात आहे, तर काहींनी यातून संस्थेला नवीन जीवन मिळेल असे म्हटले.

मदर डेअरीच्या मदतीने महानंद (Mother Dairy Takes Over Mahanand) पुन्हा उभे राहू शकेल आणि राज्यातील शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ पुरवू शकेल अशी आशा सर्वांना आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.