Onion Processing: ‘कांदा प्रक्रिया’ अतिरिक्त मालातून मूल्यवर्धन करून देणारा फायदेशीर उद्योग!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा (Onion Processing) पिकवला जातो. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यासोबतच पुणे, सोलापूर, जळगाव यांसारख्या इतर जिल्ह्यांमध्येही कांदा मोठ्या प्रमाणात पिकतो. शेतकर्‍यांना अनेकदा कांदा जास्त काळ साठवून (Onion Storage) ठेवण्यात त्रास होतो, कारण तो खराब होऊ शकतो किंवा बर्‍याचदा कांद्याचे वजनही कमी होते. काही भागात साठवणुकीच्या पुरेशा सोयी नाहीत. या समस्या सोडवण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांद्यावर प्रक्रिया उद्योग (Onion Processing Industry) सुरू केल्यास त्यांना फायदेशीर ठरणार आहे.

कांद्याचे विविध उत्पादनांमध्ये रूपांतर (Onion Processing) केल्यास शेतकर्‍यांना फायदा होऊ शकतो. सध्या, भारतात उगवलेल्या अन्नपदार्थावर फार कमी प्रमाणात प्रक्रिया केली जाते. बहुतेक ते खराब होते कारण ते योग्य रित्या संग्रहित किंवा प्रक्रिया केली जात नाही. कांद्यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे ते जास्त काळ टिकत नाहीत. कांदा जास्त काळ टिकण्यासाठी, ते निर्जलीकरण (Onion Dehydration) केले जाऊ शकते आणि चिप्स, पावडर, पेस्ट, रस आणि लोणचे यासारखे (Onion Processed Products) उत्पादने आपण तयार करू शकतो. या उत्पादनांना परदेशात सुद्धा चांगली मागणी आहे.

कांदा प्रक्रियेचे फायदे (Onion Processing Benefits)

  • बाजारातील मागणी विचारात घेऊन आपणास हवा असलेला पदार्थ शेतमालापासून तयार करता येतो..
  • काही अंशी मुळ शेतमालास असलेल्या बाजारभावावर नियंत्रण आणता येईल व किंमत वाढण्यास अथवा किमान स्थिर रहाण्यासाठी सहाय्य होईल.
  • ज्या भागात शेतमाल मोठ्या प्रमाणावर विकत नाही अशा भागात शेतमाल उपलब्ध करून देता येईल.
  • कांदा प्रक्रिया उद्योगा मार्फत रोजगाराची उपलब्धता होईल परिणामी बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची मदत होईल.
  • पि‍कावरील प्रकिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामुग्री तयार करणाऱ्या उद्योगांना चालना मिळेल.
  • थोडक्यात उपरोक्त पिकांच्या मूल्यवृध्दीसाठी (Onion Value Addition) प्रक्रिया हे एक उत्कृष्ट साधन असून त्याद्वारे शेतकर्‍यास खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकतो.

कांदा प्रक्रिया पदार्थ (Onion Processing)

कांद्याच्या निर्जलीकरण चकत्या: यासाठी सुरुवातीला कांद्याचे लहान किंवा गोलाकार काप करून घ्यावेत. नंतर हे काप किंवा चकत्या वेगवेगळ्या उच्च तापमानात निर्जलीकरण करून घ्यावेत. पुढे या चकत्या हवाबंद डब्यात किंवा पाकिटात भरून पॅक कराव्यात. निर्जलीकरण केलेल्या चकत्याचा उपयोग सूप, सॉस, सॅलड सजविण्यासाठी केला जातो.

कांद्याची पावडर (Onion Powder): यासाठी सुरुवातीला कांद्याचे लहान किंवा गोलाकार काप करून घ्यावेत. हे काप वेगवेगळ्या उच्च तापमानाच्या सानिध्यात निर्जलीकरण करून घ्यावे. नंतर या कापांना मिक्सरमध्ये कुटून किंवा ग्राईन्ड करून कांद्याची पावडर बनविली जाते. ही पावडर हवाबंद डब्यात किंवा पाकिटात भरून पॅक करावी. निर्जलीकरण केलेल्या पावडरचा उपयोग सूप, सॉस, सॅलड यासाठी वापरण्यात येतो.

कांद्याचे लोणचे (Onion Pickle): कांद्याचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम कांदा सोलून त्याचे चार तुकडे करावेत. कांद्याना भरपूर मीठ आणि लिंबाच्या रसात चांगले गुंडाळा आणि सुमारे ४ तास बाजूला ठेवा. त्यानंतर स्वच्छ काचेच्या भांड्यात तेल, आमचूर पावडर, तिखट, कांदा, बाकीचे मसाले आणि लिंबाचा रस आणि मीठ टाकून उरलेले तेल वरून टाकावे. नंतर जार हवाबंद करावा आणि सुमारे एक महिन्या पर्यंत हे लोणचे आरामात टिकते.

कांदा तेल (Onion Oil): अल्कोहोल विरहीत पेय, आईस्क्रीम, चॉकलेट, च्युईंगम, लोणचे इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी कांद्यापासून तयार केलेल्या तेलांचा उपयोग होतो. कांद्याचे तेल पिवळसर तपकिरी रंगाचे असते.

कांदा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे यंत्र व उपकरणे

  • पिलिंग मशिन (साल /बाह्य आवरण काढण्याचे यंत्र)
  • चकत्या करण्यासाठी मशीन
  • ड्रायर मशिन
  • मिक्सिंग मशीन
  • पल्वलाझर
  • अॉटोमॅटिक पाऊच पॅकिंग मशिन
  • लेबलिंग मशिन