Goat Weight Loss: शेळ्यांचे वजन कमी होत आहे का? जाणून घ्या कारणे आणि त्यावर उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेळीपालन (Goat Weight Loss) व्यवसायाचा विचार केला तर प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी शेळ्यांचे पालन (Goat Farming) केले जाते. परंतु शेळ्यापासून मिळणारे मांस (Goat Meat) उत्पादन हे शेळ्यांच्या वजनावर अवलंबून असते. परंतु बऱ्याचदा काही कारणांमुळे शेळ्यांचे वजन कमी होते किंवा वाढत नाही व त्यामुळे पशुपालक शेतकर्‍यांना फार मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे आपल्या लेखात शेळ्यांचे वजन कमी होण्याची कारणे (Goat Weight Loss) व उपाययोजना यांची माहिती घेऊ.

शेळ्यांचे वजन कमी होण्याचे कारणे (Reasons For Goat Weight Loss)

  • शेळ्यांमध्ये बऱ्याच प्रकारचे रोग (Goat Diseases) उद्भवतात व त्यामुळे वजनावर विपरीत परिणाम होतो. दुसरे कारण म्हणजे जेव्हा कळपात शेळ्या राहतात तेव्हा चाऱ्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण होते, ही बाब देखील शेळ्यांच्या शरीराचे वजन कमी करण्यास कारणीभूत आहे. कळपामध्ये ज्या शेळ्या थोड्या दुर्बल किंवा विनम्र असतात अशा शेळ्यांचे वजन कमी होते. साहाजिकच कळपातील मजबूत आणि मोठ्या शेळ्या कमकुवत शेळ्यांच्या अन्न आणि जागेवर अधिकचा हक्क सांगतात व आहारात प्रवेश नाकारला जात असल्याने कमकुवत शेळ्यांना चारा व्यवस्थित मिळत नाही व शेळ्यांचे वजन घटते. 

या समस्येवर उपाय म्हणून शेळ्यांचे व तसेच त्यांच्या जाती व शारीरिक स्थितीनुसार त्यांचे वर्गीकरण करणे नेहमीच योग्य असते.

  • जर शेळ्यांमध्ये दातांची (Goat Teeth Problem) समस्या असेल तर यामुळे देखील वजन कमी (Goat Weight Loss) होऊ शकते. दातांच्या समस्या मुळे चारा खाण्याच्या आणि गिळण्याच्या सामान्य प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे शेळ्यांना पुरेशा चाऱ्यापासून वंचित राहावे लागते.

या समस्येवर उपाय म्हणून वजन कमी करण्याच्या तपासणीमध्ये दात परिक्षण करून घेणे महत्त्वाचे असते.  दातांची समस्या ही विविध प्रकारच्या खनिजांची कमतरता किंवा फ्लोरोसिसच्या अतिरेकामुळे होत असते.

  • हार्ड स्टेनिंग हार्ड ड्राफ्टिंग, जबडा सुजणे हे देखील वजन कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत.

या समस्येचे निदान करायचे असेल तर शेळ्यांच्या तोंडाची तपासणी वेळोवेळी करावी.

  • काही सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता जसे कॉपर, कोबाल्ट आणि सेलेनियम या आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे किंवा असंतुलनामुळे देखील शेळ्यांमध्ये वजन कमी होऊ शकते. कोबाल्टची कमतरता असली तर शरीराच्या वजनात वाढ होणे थांबते. सेलेनियम हे मेंढी पालन आणि शेळीपालन मध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. याच्या कमतरतेमुळे मादी प्राण्यांमध्ये गर्भपात आणि प्रजनन संस्थेचे समस्या वाढते. याच्या कमतरतेमुळे कोकरांची कमकुवत वाढ होते व विकास देखील थांबतो. एवढेच नाही तर कोकरामध्ये अचानक मृत्यूचे समस्या देखील दिसून येते.

या समस्येला श्वेत स्नायू रोग म्हणतात. या समस्येवर उपाय म्हणून जनावरांना खनिज मिश्रण पावडर दिले गेले पाहिजे.

  • जोन्स रोग मेंढी (Jones Disease in Goat) आणि शेळ्यांमधील जुनाट आजार आहे व हा वजन कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतो. यामध्ये खाद्य योग्य प्रमाणात खाल्ले तरीही प्रादुर्भावित प्राण्याच्या जबड्यात खाली पाणी जमा होते, अशक्तपणा येतो तसेच मेंढ्यांमध्ये लोकर कमी होते, हगवन इत्यादी लक्षणे दिसतात.
  • शेळ्यांच्या पायाला लंगडेपणा असणे हीदेखील एक समस्या असून हा रोग एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यांमध्ये पसरतो व वजन कमी करत असतो.

वरील दोन्ही कारणांसाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने शेळ्यांना (Goat Weight Loss) योग्य उपचार करावेत.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.