Bogus Seeds: शेतकऱ्यांनो, बोगस बियाण्यांची तक्रार करा थेट ‘या’ नंबरवर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामापूर्वी बियाणे (Bogus Seeds) खरेदीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू होते. आणि यावेळी सर्वात मोठी समस्या असते ती बोगस बियाण्यांची (Bogus Seeds).राज्यातयवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या घुसखोरीसह अतिरिक्त पैसे आकारण्याच्या तक्रारी लक्षात घेता कृषी विभागाने (Agriculture Department) टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नंबरवर तक्रार (Bogus Seeds Complaint Number) दाखल करता येणार आहे. तक्रार करणार्‍याचे नाव गोपनीय ठेवता येणार आहे. या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. या तक्रारीची शहानिशा करून कारवाई होणार आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात (Kharif Season) नऊ लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 24 लाख पॅकेट कपाशीचे बियाणे (Cotton Seeds) लागणार आहे.
यासह विविध पिकांचे बियाणे (Bogus Seeds) लागणार आहे. बियाणे विक्री करताना गाव पातळीवर शेतकर्‍यांची फसवणूक होण्याचा धोका आहे. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने 9403229991 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. या नंबरवर कृषिविषयक तक्रारी शेतकऱ्यांना नोंदविता येणार आहे. हा फोन कॉल फ्रीमध्ये करता येणार आहे. याशिवाय ही संपूर्ण माहिती राज्य स्तरावर नोंदवली जाणार आहे. 

यानंतर जिल्हा स्तरावर याबाबतची माहिती दिली जाणार आहे. यामुळे तक्रारीतील वास्तव जाणण्याची जबाबदारी कृषी विभागावर येणार आहे. यातून गाव पातळीवरील गैरप्रकार तात्काळ बंद करण्यास मदत होणार आहे. हा क्रमांक शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारा राहणार आहे. टोल फ्री क्रमांकामुळे कृषी विभागाला वेळेपूर्वीच गैरप्रकाराची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. यामुळे हा टोल फ्री क्रमांक सर्वांनाच उपयोगी पडणार आहे.

बोगस बीटी अन् खत (Bogus Seeds)

बोगस बीटी बियाण्याची (Bogus BT Seeds) घुसखोरी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात होते. यासाठी छुप्या मार्गाचा अवलंब होतो. टोल फ्री नंबरमुळे शेतकऱ्यांना याविषयाची गोपनीय माहिती देता येणार आहे. यातून बोगस बीटी अथवा बोगस (Bogus Seeds) खतासारख्या प्रकाराला रोखता येणार आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.