हॅलो कृषी ऑनलाईन: महाबीजच्या सोयाबीन आणि भाताच्या बियाणे दराची (Mahabeej Seeds) घोषणा झाली आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून (Mahabeej) देण्यात येणार्या सोयाबीन बियाण्याचा (Soybean Seed Rate) दर प्रति किलो 25 रूपयांनी कमी झाला आहे. मात्र, भाताच्या विविध वाणांच्या (Rice Seed Rate) दरात सरासरी प्रति किलो 10 रूपयांची वाढ झाली आहे (Mahabeej Seeds).
महाबीजने सोयाबीन व भाताचे 3100 क्विंटल बियाणे (Mahabeej Seeds) विक्रेत्यांकडे पोहोच केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून, वळीव पावसामुळे मशागतीच्या कामांना गती आली आहे. येत्या आठ दिवसांत खरीप (Kharif Season) पेरण्यांची धांदल उडणार आहे
त्यादृष्टीने ‘महाबीज’ व खासगी विक्रेत्यांकडे बियाणे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यासाठी या हंगामात 37 हजार 771 क्विंटल बियाण्याची गरज आहे. त्यात भाताची 23 हजार 940, तर सोयाबीनची 11 हजार 261 क्विंटलची मागणी आहे.
त्यापैकी खासगी विक्रेत्यांकडून जास्त पुरवठा केला जातो. ‘महाबीज’ने आतापर्यंत भाताचे 1300 क्विंटल, तर सोयाबीनचे 1800 क्विंटल बियाणे जिल्ह्यातील अधिकृत विक्रेत्यांकडे पाठविले आहे.
98% प्रमाणित बियाणेच विक्रीस
महाबीजतर्फे शेतकर्यांकडून बियाणे (Mahabeej Seeds) खरेदी करून त्यावर प्रक्रिया केली जाते. आष्टा येथे प्रक्रिया केंद्र असून, तिथे 98 टक्के प्रमाणित असलेले बियाणेच (Certified Seeds) विक्रीस पाठवले जाते.
भातांच्या बियाण्यांचे दर
इंद्रायणी: 65
रत्नागिरी: 56
जया: 51
कर्जत: 60
सोयाबीन (नवीन) : 87
सोयाबीन (जुने) : 85
यंदा 450 हेक्टरवर बीजोत्पादन
महाबीज’ने यंदा 450 हेक्टरवर बीजोत्पादनाचा (Mahabeej Seeds) कार्यक्रम राबविला आहे. यामध्ये इंदायणी’, भोगावती’, ‘फुले समृद्धी’, ‘को-51, ‘आरटीएन-1’ तर पन्हाळ्यात नागली घेतली जाणार आहे.
शासन बियाण्यासाठी अनुदान देणार का?
गेल्या वर्षी शासनाने सोयाबीनच्या बियाण्याला 45 टक्के अनुदान (Seed Subsidy) दिले होते. यंदा मात्र अद्याप शासनाने निर्णय घेतलेला नाही.