Maharashtra Development Services Organization: महाराष्ट्र विकास सेवा संस्था होणार आता ‘संगणकीकृत’; शेतकर्‍यांना 151 सेवेचा घेता येणार गावातच लाभ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील विकास सेवा संस्था (Maharashtra Development Services Organization) संगणकीकृत (Computerized Services) करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला होता. त्यानुसार आता राज्यातील अनेक गावातील सेवा (Development Services) संस्थांवर संगणक बसवण्यात आले आहे. यामुळे गावातील सेवा (Village Services) संस्थांमध्ये वहीवर चालणारे काम आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. तसेच इतर कामेही ऑनलाईन पद्धतीने व्यवहार सुरू झाले आहेत. या संस्था आता गावातच शेतकर्‍यांना 151 सेवा पुरविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत (Maharashtra Development Services Organization) .

पूर्वी केवळ रासायनिक खते पुरवणाऱ्या गावपातळीवरील विकास सेवा संस्थांना (Maharashtra Development Services Organization) आता नवीन स्वरूप प्राप्त झाले आहे. आता वीज बिल भरणे, ऑनलाईन बँकेचे व्यवहार करणे याबरोबर गावातील सभासदांसाठी उपयुक्त गरजेच्या सेवाही या संस्था पुरवणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेशी (District Central Bank) संलग्न असणार्‍या सेवा संस्था शेतकर्‍यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

या संस्था (Maharashtra Development Services Organization) गावातील शेतकर्‍यांच्या आर्थिक गरजा गावातच पूर्ण करतात. शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी सेवा संस्थांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो. गेल्या दोन महिन्यांत प्रत्येक गावातील विकास सेवा संस्थेच्या कार्यालयात नवीन संगणक, प्रिंटर, इंटरनेट उपकरणे दाखल झाली आहेत. सहकारी सेवा संस्थांचे दप्तरही संगणीकृत झाले असून, त्या अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. प्रत्येक गावातील सेवा संस्थांचा पारंपरिक स्वरूप बदलून आधुनिक रूप प्राप्त होत आहेत.

ग्रामीण भागात पूर्वीपासूनच सेवा संस्थांचे (Maharashtra Development Services Organization) योगदान चांगले आहे. जेव्हा मिश्र खतांची शेतकर्‍यांना गरज असे, तेव्हा सोसायटीत खत उपलब्ध व्हायचे. अलीकडच्या काळात सेवा संस्थेतून पीक कर्ज घेऊन शेतकरी रासायनिक खते, बी-बियाणे रोखीने घेऊ लागले. सेवा संस्थेतून शेती पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना शासनाच्या कर्ज माफीचा (Government Loan Waiver) लाभ मिळाला.

जेव्हा कर्जमाफी झाली, तेव्हा सामान्य शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. सेवा संस्था शेतकर्‍यांना शेती व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या आधारस्तंभ आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे गावे जगाशी (Digital Village) जोडली जात आहेत. अशावेळी विकास सेवा संस्थांकडून सभासद शेतकर्‍यांना मिळणाऱ्या सेवा वरदान ठरणार आहेत.

गावोगावच्या विकास सेवा संस्था (Maharashtra Development Services Organization) शासनाच्या मदतीने संगणकीकृत झाल्या आहेत. पुढील काळात सामान्य सभासदांना गावच्या सेवा संस्थेतून अधिक चांगल्या आणि ऑनलाईन सुविधा (Online Facilities) उपलब्ध होणार आहेत. सेवा संस्थेच्या सभासदांसाठी ही चांगली बाब असल्याची माहिती सेवा संस्थांच्या संचालकांकडून देण्यात येत आहे.

शेतकर्‍यांना काय फायदे मिळतील?

शेतकर्‍यांच्या वेळेची बचत होऊन त्यांना सोयीस्कर सेवा मिळतील.

व्यवहार पारदर्शक होण्यास मदत होईल.

अधिक चांगल्या सुविधा मिळतील.

शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.