Kharif Season Sowing: कृषी विभागातर्फे राज्यातील खरीप पेरणीचा प्राथमिक अंदाज जाहीर! जाणून घ्या वेगवेगळ्या पि‍काखालील क्षेत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात यावर्षीचाखरीप हंगाम (Kharif Season Sowing) गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 लाख हेक्टर क्षेत्र कमी होईल, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने (Agriculture Department Maharashtra) व्यक्त केला आहे. त्यानुसार 142 लाख 88 हजार हेक्टरसाठी 24 लाख 73 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

सोयाबीन (Soybean Area) या महत्त्वाच्या पिकाखालील क्षेत्रात कोणतीही वाढ किंवा घट अपेक्षित नसली तरी कापूस (Cotton Area) पिकाखालील क्षेत्रात सुमारे 3 लाख हेक्टरची घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे (Kharif Season Sowing).

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 6 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पेरण्यांसाठी कृषी विभागाने जिल्हास्तरीय आढावा जवळपास पूर्ण केला असून आचारसंहितेच्या कारणामुळे राज्यातील एकत्रित आढावा घेण्यासाठी सहा जूननंतरच पाउले उचलली जातील.

यावर्षी राज्यात142.88 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी (Kharif Crops Sowing) होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र 152.13 लाख हेक्टर इतके अपेक्षित करण्यात आले होते. त्यामुळे यंदा त्यात सुमारे 19 लाख हेक्टर क्षेत्राची घट (Kharif Season Sowing) होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

असे असले तरी राज्यात गेल्यावर्षी प्रत्यक्षात 130 लाख हेक्टरवरच खरीपातील पिकांची लागवड झाली होती. अपुऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीपाच्या पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. त्याचा फटका एकूण उत्पन्नावर झाला होता (Kharif Season Sowing).

कापसाचे पुरेसे बियाणे उपलब्ध
बनावट बियाण्यांच्या (Bogus Seeds) विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने कापूस बियाणे (Cotton Seeds) विक्रीला 15 मे पासूनच परवानगी दिली आहे. त्यासाठी 1 कोटी 50 लाख बियाण्यांची पाकिटे लागणार आहेत. तर सध्या 1 कोटी 70 लाख पाकिटांची उपलब्धता असल्याने शेतकयांनी जादा किमत देऊन बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सोयाबीनसाठी 38 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता

राज्यात सोयाबीनची लागवड 50 लाख 70 हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज आहे. प्रति हेक्टरी 75 किलो बियाण्यांची गरज असल्याने एकूण 38 लाख क्विंटल सोयाबीन बियाणे (Soybean Seeds) पेरणीसाठी लागणार आहे. 35 टक्के बियाणे बदल दरानुसार 13 लाख 31 हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. महाबीजकडून 3 लाख क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून 44 हजार क्विंटल, तर खासगी कंपन्यांकडून 14 लाख 93 हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धता होईल.

दुसरीकडे कृषी विभागाने मात्र  खरीपाचे क्षेत्र 10 लाख हेक्टरने क्षेत्र कमी होईल, असेही जाहीर केले आहे. यात प्रामुख्याने कापूस पिकाखालील क्षेत्रात सुमारे 3 लाख हेक्टर क्षेत्रात घट होईल (Kharif Season Sowing), असा अंदाज कृषी विभागाला आहे.
खरीपात 19 लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यात महाबीजकडून 3 लाख 75 हजार 572, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून 59 हजार 760, खासगी कंपन्यांकडून 20,38, 551 क्विंटल बियाणे उपलब्ध होतील.

प्रमुख पिकांखालील अंदाजित क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये) (Kharif Season Sowing)
सोयाबीन – 50.70

कापूस 40.70

भात – 15.30

तूर – 12.25 
मका – 9.80

बाजरी – 4.10

उडीद – 2.83 
मुग – 2.00

भुईमुग – 1.70

ज्वारी – 1.25

इतर पिके – 2.04