हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी (VNMKV News) अंतर्गत येणाऱ्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे (Agricultural Research Centre) तुरीचा बीडीएनपीएच 18 – 5 (BDNPH 18 – 5) हा महाराष्ट्रातील तुरीचा पहिला संकरित वाण (Tur Hybrid Variety) विकसित करण्यात आलेला आहे. या संकरित वाणास अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपूरद्वारा इक्रीसॅट, हैदराबाद येथे घेण्यात आलेल्या वार्षिक समूह बैठकीत मान्यता देण्यात आली असून या वाणाची शिफारस महाराष्ट्रासह भारताच्या मध्य विभागासाठी करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाद्वारे (VNMKV News) शिफारस करण्यात आलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण (Tur Variety) आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (VNMKV News) बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने (Agriculture Research) यापूर्वी तुरीच्या वाणाच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम केलेले आहेत आणि बीडीएनपीएच 18 – 5 या संकरित वाणामुळे शेतकर्यांना भरघोस उत्पादन मिळणार असून त्यांना भरीव आर्थिक उन्नती साधता येईल. शेतकर्यांसाठी हा संकरित वाण लवकरच उपलब्ध करण्यात येईल असे मा. कुलगुरू (Vice Chancellor VNMKV) डॉ. इन्द्र मणि यांनी नमूद केले.
बीडीएनपीएच 18 – 5 तुरीच्या वाणाची वैशिष्ट्ये
- या वाणाची उत्पादकता 1759 ते 2159 किलोग्रॅम प्रति हेक्टरी इतकी आहे.
- हा वाण 155 ते 170 दिवसात तयार होतो.
- दाण्याचा रंग पांढरा आहे.
- हा वाण मर आणि वांझ या तुरीच्या प्रमुख रोगांकरिता मध्यम प्रतिकारक आहे.
- हा वाण किडींना कमी प्रमाणात बळी पडतो.
सदर वाण विकसित करण्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (VNMKV News) माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, माजी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. के. पाटील, डॉ. व्ही. के. गीते या शास्त्रज्ञांनी डॉ. के. टी. जाधव, प्रशांत सोनटक्के, डॉ. पी ए पगार आणि डॉ ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी विशेष कार्य केले.
या वाणाच्या प्रसारामुळे विद्यापीठामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी कृषि संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन केले.