हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात विविध प्रदेशानुसार (MSAMB Scheme) तेथील प्रसिद्ध असलेल्या मालाला भौगौलिक चिन्हांकन (GI) म्हणजेच मानांकन मिळत असते. भौगौलिक चिन्हांकन (Geographical Indication) मिळालेल्या मालाला विशेष महत्त्व समजले जाते. तर त्या मालाचा दर्जाही वाढतो आणि विक्रीसही मदत होत असते. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत साधारण 28 शेतमालाला जीआय मानांकन (GI Agricultural Products) मिळालेले आहे.
ज्या शेतमालाला, फळ पिकांना, भाजीपाला पिके, मसाला पिके, कृषी पिके आणि प्रक्रिया उत्पादनांना जीआय मानांकन मिळालेले आहे अशा उत्पादनाच्या विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी आणि शेतकर्यांना माल विक्रीत प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून (MSAMB) काही योजना (MSAMB Scheme) राबवण्यात येत आहेत.
योजनांचे उद्दिष्टे (Government Schemes)
भौगोलिक चिन्हांकन/मानांकन संदर्भातील माहिती सर्व घटकापर्यंत पोहोचवणे.
- उत्पादकांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे व नोंदणीचे आवश्यकते बाबतची माहिती उत्पादकांना देणे.
- भौगोलिक मानांकन उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणे. यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून राज्यातील भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रचार, प्रसिद्धी, नोंदणी व मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी 4 स्वतंत्र अर्थ सहाय्याच्या योजना (MSAMB Scheme) सुरू करण्यात आलेल्या आहेत.
योजना क्र. 1 – भौगोलिक चिन्हांकन / मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनासाठी अनुदान योजना (MSAMB Scheme)
लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणार्या संस्था.
लाभाचे स्वरूप एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजनासाठी कमाल मर्यादा रूपये रू 10,000/- प्रति प्रशिक्षण (किमान 100 शेतकर्यांसाठी)
योजना क्र. 2 – भौगोलिक चिन्हांकन / मानांकन नोंदणीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देण्याकरिता नोंदणी शुल्कासाठी अनुदान (MSAMB Scheme)
योजना लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणारी संस्था.
लाभाचे स्वरूप : भौगोलिक मानांकन नोंदणीसाठी प्रति शेतकरी रु. 200/- अनुदान संबंधित कृषि उत्पादनाचे मालकी असणार्या संस्थेला देण्यात येईल.
योजना क्र. 3 – भौगोलिक चिन्हांकन / मानांकन नोंदणी प्राप्त उत्पादनांचे मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान योजना (MSAMB Scheme)
उद्देश भौगोलिक मानांकन नोंदणीकृत नैसर्गिक गुणवत्ता असलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचवणे, भेसळीला प्रतिबंध करणे, विशिष्ट भौगौलिक क्षेत्रात उत्पादित होणारी उत्पादने चिन्हासह विक्री करण्यासाठी बाजार विकासा करिता (सुयोग्य पॅकिंग, लेबलिंग, ब्रँडींग, बारकोड, वेबसाईट विकास इ.) अर्थ सहाय्य करणे.
लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणारी संस्था.
लाभाचे स्वरुपः उत्पादनांच्या बाजार विकासा करिता येणार्या खर्चाच्या 50% अथवा जास्तीत जास्त रक्कम रु.3,00,000/- पर्यंत अर्थ सहाय्य संबंधित कृषी उत्पादनाचे मालकी असणार्या संस्थेला देण्यात येईल.
योजना क्र. 4 – कृषि पणन मंडळाच्या फळे व कृषिमाल महोत्सव उपक्रमामधील भौगोलिक चिन्हांकन / मानांकन उत्पादनांच्या स्टॉलकरीता अर्थ सहाय्य योजना (MSAMB Scheme)
लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणारी संस्था.
स्वरूप : प्रति स्टॉल रू. 3000/- अर्थ सहाय्य