हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी क्षेत्रात (Pradhan Mantri Micro Food Industry Yojana) सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शेतकर्यांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना (Government Schemes) राबवत आहे. अशाच एका योजनेमध्ये पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME Scheme) समाविष्ट आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी, उद्योजक, महिला आणि बेरोजगार युवक अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करू शकतात आणि त्यासाठी 35% पर्यंत अनुदान मिळवू शकतात. जाणून घेऊ या योजनेची (Pradhan Mantri Micro Food Industry Yojana) माहिती.
योजनेचे मुख्य मुद्दे (Pradhan Mantri Micro Food Industry Yojana)
अनुदान: वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35% किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपये तर सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर आणि मूल्य साखळी घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या 35% किंवा कमाल 3 कोटी रुपये अनुदान दिले जाईल.
लाभार्थी: उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था आणि गट. यात शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसेवक गट, सहकारी आणि शासकिय संस्थांचा समावेश आहे.
अर्थ सहाय्य: भांडवली गुंतवणूक, सामायिक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसेवक गटाच्या सदस्यांना भांडवल, मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी मदत.
विशेष लाभ: आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट (Farmers Group), शेतकरी उत्पादक कंपनी आणि वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प आखताना या योजने (Pradhan Mantri Micro Food Industry Yojana) सोबतच कृषी पायाभूत सुविधा योजनेचा (Agriculture Infrastructure Fund Scheme) लाभ घेतल्यास त्यांना अनुदाना सोबत 3% व्याजात सवलत मिळेल.
योजनेची आतापर्यंतची प्रगती (Pradhan Mantri Micro Food Industry Yojana)
- या योजने (Pradhan Mantri Micro Food Industry Yojana) अंतर्गत 437 लाखाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते.
- यापैकी 391 लक्षांक साध्य झाले आहेत आणि लाभार्थ्यांना 13.50 कोटी रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
- राज्यात 391 नवीन अन्न प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत.
अधिक माहितीसाठी
लाभार्थी कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकार्यांशी संपर्क साधू शकतात. अधिक माहितीसाठी https://pmfme.mofpi.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या