हॅलो कृषी ऑनलाईन: पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा (PM Kisan 17th Installment) करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंजूरी दिली आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी याविषयीचा पहिला निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचे तिसऱ्यांदा सूत्र स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय शेतकर्यांसाठी घेतला आहे. त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) हप्ता जारी केला आहे. त्याचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकर्यांना होणार आहे.
हप्ता जमा झाला की नाही ते असे तपासा (PM Kisan Beneficiary Status)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेतंर्गत 17 वा हप्ता जमा (PM Kisan 17th Installment) करण्यास मंजूरी दिली आहे. त्याची रक्कम जवळपास 20,000 कोटी रुपये आहे. ही रक्कम 9.3 कोटी शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल. योजनेतंर्गत शेतकर्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये जमा होतात.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता (PM Kisan 17th Installment) त्या शेतकर्यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल.
हप्ता तपासण्यासाठी खालील स्टेप्सचे पालन करा (PM Kisan 17th Installment)
- pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
- शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा.
- लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक नोंदवा.
- “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.
ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्या सोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan 17th Installment) योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा.