Infertility In Sheep: जत तालुक्यात मेंढ्यांमध्ये वांझपणाचा धोका वाढतोय; करा ‘हे’ उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जत तालुका माडग्याळ मेंढ्यांसाठी (Infertility In Sheep) प्रसिद्ध आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असतानाच जत तालुक्यातील (Jat Taluka) मेंढपाळ व्यवसायाला (Sheep Farming) फटका बसला आहे तो मेंढ्यामध्ये गर्भधारणा न होण्यामुळे (Infertility In Sheep). ओल्या चाऱ्याच्या अभावामुळे (Green Fodder Shortage) कुपोषित मेंढ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गर्भधारणा न झाल्यामुळे मेंढ्यांचे उत्पादन (Sheep Reproduction) थांबले आहे. मेंढीपालन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. नैसर्गिक संकटामुळे मेंढीपालन व्यवसायाचे लाखो रूपयांचे नुकसान होणार आहे. जत तालुक्यामध्ये शेळ्या-मेंढ्यांची संख्या 1 लाख 95 हजार 438 इतकी आहे. त्यापैकी मेंढ्यांची संख्या 1 लाख इतकी आहे.

माडग्याळ जातीची मेंढी (Madgyal Sheep) प्रसिद्ध आहे. उत्पन्नही चांगले मिळत असल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो. माडग्याळ येथील आठवडा बाजार शेळ्या-मेंढ्यासाठी प्रसिद्ध आहे. कोट्यावधी रूपयांची उलाढाल या बाजारात होते.

माडग्याळ जातीच्या काळ्या व पांढुरक्या पट्ट्याच्या मेंढ्या पाळल्या जातात. ही मेंढी जास्त काटक, वजनाला चांगली, चवदार मांस मिळत असल्यामुळे मागणी मोठी आहे. एका मेंढीपासून वर्षाला 7 ते 8 हजाराचे उत्पन्न मिळते.

तालुक्यातील पांढरेवाडी, कुलाळवाडी, सिद्धनाथ, दरिबडची, लकडेवाडी, मोटेवाडी, भिवर्गी, जालिहाळ खुर्द, तिल्याळ, करजगी, बोर्गी आदी भागात मेंढ्यांची संख्या अधिक आहे.

100 ते 150 मेंढ्यांची खांडे आहेत. मेंढ्याचे प्रमुख खाद्य झाडपाला, बाभळीच्या शेंगा, ओले गवत आहे. पावसा अभावी बाभळीची झाडे, गवत वाळून गेले आहे. सकस आहारासाठी जनावरे कुपोषित झाली आहेत. गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही (Infertility In Sheep).

वाढती उष्णता, सकस आहाराचा अभाव, दूषित पाण्यामुळे गर्भपात व गर्भधारणा न होण्याच्या (Infertility In Sheep) प्रमाणात 20 ते 30 टक्के एवढे आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये मेंढ्या हिंमतीने जगविल्या आहेत. गर्भपात झाल्यामुळे पूर्ण खांडे मोकळी झाली आहेत. यापूर्वी पहिल्यांदाचा मोठा फटका बसला आहे, असे मेंढपाळ सांगत आहेत.

हे उपाय करा
• हत्तीगवत, लसुण गवत, पांगारी, बाभळीच्या झाडांची व गवताची लागण करावी.
• ओल्या चाऱ्याचा पुरवठा करावा.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.