हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात सध्या मुसळधार पावसाला (Rainwater Drainage) सुरुवात झाली असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याचीही नोंद झाली आहे. खरीप पेरण्यांच्या सुरुवातीला अत्याधिक पाऊस झाल्याने शेतात पाणी साठले जाऊ लागले तर पिकांसाठी हे हानिकारक ठरू शकते. शेतात जमा झालेल्या पाण्यामुळे (Water Logging) पिकांच्या मुळांना ऑक्सिजन मिळण्यास अडथळे निर्माण होतात, मातीची धूप होऊ शकते. परिणामी पिकांना रोग व किडीचा सामना करावा लागू शकतो (Water Logging Problems).
यासाठी वेळीच जमिनीवर साठलेले अतिरिक्त पाणी काढून (Rainwater Drainage) टाकण्याचा तज्ज्ञ सल्ला देतात. यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊ या.
शेतात चर काढणे
अनेक शेतकरी अतिरिक्त साठलेल्या पाण्याला वाहून जाण्यासाठी (Rainwater Drainage) शेतात चर काढून पाणी काढतात. शेतात वेगवेगळ्या आकाराचे आणि खोलीचे चर काढल्याने शेताच्या उताराच्या दिशेने पाणी वाहून जाते.
वाफे तयार करणे (Bed Preparation)
जमिनीत मुरून साठलेल्या अतिरिक्त पाण्याला वाहून जाण्यासाठी (Rainwater Drainage) वाफा पद्धत प्रभावी मानली जाते. रूंद वाफा आणि त्यामध्ये सरी तयार करून अतिरिक्त पाण्याचा प्रवाह या पद्धतीत नियंत्रित करता येतो. ही पाण्याचा निचरा करण्याची आधुनिक पद्धत मानली जाते. यात रूंद सरी वरंबा (BBF Sowing) पद्धतही प्रामुख्याने वापरली जाते.
पाण्याचा निचरा (Water Drainage)
निचरा प्रणाली (Drainage System) हा पाण्याचा निचरा करण्याचा सोपा मार्ग आहे. यात शेताच्या उताराच्या दिशेने चर खोदले जाते. ज्यात नैसर्गिकरित्या पाणी वाहून अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो (Rainwater Drainage). ही पद्धत जमिनीच्या पृष्ठभागावर साठलेल्या अधिकच्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यात मदत करते.
शेतजमिनीला उतार देणे (Land Slope)
अनेक शेतकरी पारंपरिक जमिनीला उतार देण्याची पद्धत आजही वापरतात. हा अतिशय सोपा व प्रभावी उपाय मानला जातो. जेणेकरून पाणी नैसर्गिकरित्या वाहून जाते. पावसाच्या दिशेने किंवा नैसर्गिक जल वाहिन्या ज्या दिशेने असतील त्या बाजूने देखील उतार केला जातो.
मुलस्थानी जलसंधारण (Water Conservation)
या पद्धतीत शेताच्या उताराला आडवी पेरणी करतात. उताराच्या दिशेने चर तयार करून सरींच्या मध्ये आडवी पेरणी केली जाते. असे केल्याने जमिनीवरील माती तिथेच अडवली जाते. आणि वाहून जाणारे पाणी मुरून संरक्षित पाण्याचा स्त्रोत तयार होतो. वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवण्यासाठी उताराला आडवी पेरणी केल्याने संरक्षित पाणी मिळते. यामुळे जमिनीची धूप थांबण्यास सुद्धा मदत होते.