हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या काळात उच्च शिक्षण (Success Story) घेणार्या प्रत्येक तरुण तरुणीची एखाद्या मोठ्या बहु राष्ट्रीय कंपनीत उच्च पगारासह नोकरी करायची इच्छा असते. परंतु काहीजण असे सुद्धा असतात जे या सुखात रमण्यापेक्षा आपली आवड आणि नवीन काहीतरी करण्याच्या मागे लागतात (Success Story).
आज आपण अशाच एका एमबीए झालेल्या तरुणी बद्दल जाणून घेणार आहोत जिने उच्च पदाची नोकरी सोडून गोवंश संवर्धन (Govansh Samvardhan) आणि त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांचा व्यवसाय सुरु केलेला आहे.
परसदारी गाय म्हणजे सार्वत्रिक समृद्धी, कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याला बळकटी असा आजोबांचा मूलमंत्र जपणारी श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे राहणारी वर्षा संजय मरकड (Varsha Sanjay Marakad) या तरुणीने एक वेगळेच उदाहरण आजकालच्या मुलामुलींसमोर निर्माण केले आहे (Success Story).
एमबीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात मिळणाऱ्या मोठ्या पॅकेजच्या नोकरीकडे पाठ फिरवून वर्षा हिने गोवंश संवर्धन वाढवीत त्यातून मिळणाऱ्या शेण, गोमूत्रापासून उपपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे (Cow Products Business).
देशी गायींचे (Desi Cow Breeds) संगोपन करीत दोनशे गायींची गोशाळा (Goshala) चालवीत त्याला उद्योगाचा आकार तिने दिला आहे. पर्यावरण रक्षण, प्रदूषण निर्मूलन, सकस आहारातून शतायुषी पिढीची निर्मिती व्हावी यासाठीची ग्रामीण तरुणीची ही झेप सार्वत्रिक कौतुकाची ठरत आहे. गावरान गायीचे शेण, तूप, दही, ताक, गोमूत्र म्हणजे आरोग्य वृद्धीचा प्रवाही मंत्र मानला गेला आहे.
या महतीला आयुर्वेद दुजोरा देते. यातूनच शेणापासून पणत्या, धूप, अगरबत्ती, जळाऊ पावडर, गांडुळ खत, सेंद्रिय खत, गोवर्या, शेणाच्या विटा यासारखे दिसणारे लाकडी ठोकळे निर्मितीचा प्रवास सुरू झाला (Success Story).
गोमुत्राच्या चिकित्सेच्या माध्यमातून सर्वांगीण अभ्यास करून औषधी निर्मिती करण्याचा प्रयत्न वर्षा भविष्यात करणार आहे.
दवणा अगरबत्तीला नाथ संप्रदायांत मोठी मागणी आहे. हे उत्पादन घेण्यासाठी शेणाची पावडर तयार करण्याचे संयंत्र बसविल्याने धूप अगरबत्तीचे उत्पादन या गोशाळेत वाढले आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ अशी शासनाची घोषणा हाच संदेश ध्वनित करते.
मुलीचा हट्ट पाहून वर्षाचे वडील संजय मरकड यांनीही आर्थिक सहभाग लावीत विविध यंत्र हाताळण्यासाठी सात कामगार तिच्या हाताखाली मदतीला दिले आहेत. आई, भाऊ, भावजयी असे घरातील सदस्यही मदत कार्यात सहभाग देत आहेत.
वेगळा मार्ग निवडून तो यशस्वी करून दाखवणार्या वर्षाचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे (Success Story).