हॅलो कृषी ऑनलाईन: मध योजना (Madh Kendra Yojana) ही महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग (Maharashtra Khadi Gram Udyog) मंडळामार्फत राबविली जाणारी योजना आहे. यात मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान (50% Subsidy), शासनाच्या हमी भावाने मध खरेदी (Honey Purchase With MSP), विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची (Bee Protection and Conservation) जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत (Madh Kendra Yojana).
लाभार्त्यांसाठी आवश्यक अटी
- यातील वैयक्तिक मधपाळ योजनेचा (Madh Kendra Yojana) लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा.
- स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ योजनेसाठी लाभार्थी वैयक्तिक केंद्र चालक असावा. किमान 10 वी उत्तीर्ण असावा, 21 वर्षांपेक्षा जास्त वय असावे.
- अशा व्यक्तींच्या अथवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेती किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी.
- लाभार्थीकडे मधमाशापालन (Bee Keeping), प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
- केंद्र चालक संस्था योजनेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे किंवा 10 वर्षांसाठी भाडे तत्त्वावर घेतलेली किमान एक एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- एक हजार चौरस फूट इमारत असावी यासह इतर अटींचे पालन करणे आवश्यक आहे.
30 जुलैपर्यंत करता येणार अर्ज (Madh Kendra Yojana)
शेतकरी, कातकरी, सुशिक्षित बेरोजगार, पात्र संस्था, लाभार्थ्यांनी 30 जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन हिंगोली जिल्हा ग्रामोद्योग अधिकार्यांनी केले आहे.