हॅलो कृषी ऑनलाईन: उभ्या पिकात वेगवेगळी आंतरमशागतीची कामे (Weeding Machine) करावी लागतात. या कामासाठी छोटी अवजारे व कृषी यंत्रांचा (Agri Machine) वापर फायदेशीर ठरू शकतो. कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील युवा शेतकरी केशव गायकवाड यांच्या कपाशी पिकात आधुनिक खुरपणी यंत्राचा वापर करण्यात आला. या खुरपणी यंत्राचे (Weeding Machine) वैशिष्ट्ये म्हणजे या द्वारे शेतात उभ्याने खुरपणी करता येते.
खुरपणी यंत्राची वैशिष्ट्ये (Weeding Machine)
या यंत्रास कपाशीच्या (cotton Crop) पिकातील अंतर्गत मशागतीसाठी (Intercultural Operations) एकरी 5 लिटर इंधन लागते. मशागतीचा एकरी भाव 2 हजार आहे. एक एकर पिकातील अंतर्गत मशागतीसाठी जास्तीत जास्त अडीच तास लागतात व कमीत दीड तास लागतात. यंत्राला छोटे स्वतंत्र रोटाव्हेटर (Rotavator) आहे. त्यामुळे ऊस, कपाशी यातील तण काढण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये 18 पाते असून, ती जमिनीमध्ये 15 सेंमी पर्यंत खोल जातात. तण मुळापासून नष्ट होते. हाताळण्यास सोपे व सहज वापरता येते. देखभाल व दुरूस्ती खर्च कमी येतो. तसेच याचा वापर केल्यामुळे (Weeding Machine) वेळेची, पैशाची व श्रमाची बचत होते.
बैलजोडीची अवजारे (Bullock cart Implements) व बैलजोडी आता हळूहळू नामशेष होत चालली आहे. अगदी कमी शेतकर्यांकडे बैलजोडीची अवजारे बघण्यास मिळत आहे. पाऊस कमी जास्त असल्याने चाऱ्याचा बिकट प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्याचे भाव पणं जास्त असतात. पुढे पिकाला योग्य भाव मिळेल का नाही हे आधीच सांगू शकत नसल्याने शेतकरी काटकसरीने पिकाला खर्च करतो. शेतकर्यांच्या हितासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा (Agriculture Modern Machinery) वापर केला जातो. या खुरपणी यंत्राला (Weeding Machine) शेतकरी जास्त पसंती देत आहेत.
शेतकर्याने मागील वर्षी हे आधुनिक खुरपणी यंत्र अवघ्या 50 हजार रुपयास खरेदी केले. या यंत्राच्या साहाय्याने कमी वेळेत जास्त मशागत करता येते. आणि एका वर्षात जवळपास या यंत्राची किमत वसूल केली आहे. या यंत्रास शेतकरी जास्त प्रमाणात पसंती देत आहे.
मजूर मिळत नसल्याने पिकांची मशागत करणे अवघड होते. मजूरांची रोजंदारी दिवसाला कमीत कमी तीनशे ते चारशे रूपये आहे. एवढा खर्च करणे शेतकर्यास परवडणारा नाही आहे. या यंत्राच्या साहाय्याने केलेल्या मशागतीस कमी खर्च लागतो. व वेळेनुसार लगेच उपलब्ध होते. हे यंत्र (Weeding Machine) खरेदी करण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे म्हणजे गरजू शेतकरी ते खरेदी करू शकतील.