Goat Care In Rainy Season: पावसाळ्यात शेळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पावसाळा सुरू झाल्यावर पशू/जनावरांची (Goat Care In Rainy Season) विशेष काळजी घ्यावी लागते, कारण यावेळी जनावरांना वेगवेगळे आजार (Animal Rainy Season Diseases) होण्याची शक्यता असते.

शेळीपालन (Goat Farming) करताना योग्य व्यवस्थापन नसेल तर अधिक खर्च होऊन काहीच उत्पन्न हाती लागत नाही. यासाठीच शेळी पालनात योग्य व्यवस्थापनास (Goat Care In Rainy Season) अधिक महत्व दिले गेले आहे.

शेळीपालन करताना व्यवस्थापनात (Goat Farming Management) सर्वात जास्त काळजी ही गोठ्यात असणारी आर्द्रता कमी राखण्यासाठी घ्यावी लागते. कारण शेळ्यांना आर्द्रता सहन होत नाही. त्यामुळे त्यांना श्वसनसंस्थेचे रोग (Respiratory diseases In Goats) होण्याची शक्यता असते. 

पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शेळ्यांच्या व्यवस्थापनात (Goat Care In Rainy Season) त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे. तसेच शेळीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण वाढणार नाही याची काळजी घेणे देखील गरजेचे असते.

पावसाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन करताना खालील बाबी लक्षात ठेवा (Goat Care In Rainy Season)

  • कळपातील सर्व शेळ्यांना वेळोवेळी जंतनाशक औषधे द्यावीत. त्यामुळे शेळ्यांचा कळप जंतमुक्त राहू शकेल.
  • पाऊस पडल्यानंतर निर्माण झालेली आर्द्रता आणि उष्णता जंतांची अंडी, गोचीड वाढीसाठी अनुकूल असते. अशावेळी शेळ्यांच्या अंगावर गोचीड होतात. त्यामुळे शेळ्यांना रोग होतात. गोचीड शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. यावर उपाय म्हणून शेळ्यांच्या अंगावर गोचीड प्रतिबंधक औषध लावावे किंवा गोठा धुऊन घ्यावा.
  • शेळ्यांना आर्द्रता (Goat Care In Rainy Season) सहन होत नाही त्यामुळे गोठ्यातील आर्द्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी 60 वॉटचा विजेचा बल्ब रात्रभर लावून ठेवावा.
  • गोठ्यातील मलमूत्र रोजच्या रोज साफ करून गोठा कोरडा ठेवावा. गोठ्यातील जमीन जर ओली असेल तर शेळ्यांच्या पायाच्या खूरामध्ये ओलसरपणा राहून पायाला फोड येतात. यामुळे शेळ्या लंगडतात तसेच ताप येतो परिणामी शेळी चारा कमी खाते अशक्त होतात.
  • पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांना (Goat Care In Rainy Season) चरण्यासाठी बाहेर सोडू नये. पावसात जास्त वेळ शेळी भिजली की न्यूमोनियासारखा आजार होतो. यामुळे शेळी शिंकते, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते.
  • पावसाळ्यात आलेल्या कोवळ्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात, जास्त प्रमाणात हा चारा खाल्यामुळे शेळ्यांना अपचन होते. पोटफुगी, हगवणीसारखे आजार होतात. पोटफुगी होऊ नये यासाठी खाण्याचे तेल आणि खाण्याचा सोडा पाजला तर पोटफुगी कमी होते.
  • पावसाळ्यात (Goat Care In Rainy Season) करडामधील मरतुकीचे प्रमाण अधिक असते अशावेळी मरतुकीचे प्रमाण 5 ते 10 टक्क्यांपर्यंत राखले पाहिजे. यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जन्मानंतर 24 तासांच्या आत करडांना चीक/दूध पाजावे. त्यामुळे त्यांना रोगप्रतिकारक शक्ती व ऊर्जा मिळते व त्यांची पचनसंस्था साफ होण्यास मदत होते.
  • गाभण शेळीची पावसाळ्यात योग्य प्रकारे काळजी घ्यावी, कारण पावसाळ्यात गोठ्याची जमीन ओलसर राहते. ज्यामुळे चालताना घसरून पडणे हा प्रकार आढळतो परिणामी गर्भपात होण्याची शक्यता असते.
  • पावसाळ्यात शेळ्या विण्याचे प्रमाण अधिक असून या काळात गर्भाशयाचे तोंड उघडे असते. अशावेळी योनिचा भाग व बाजूचा भाग स्वच्छ नसेल तर गर्भाशयात जंतुचा शिरकाव होण्याची शक्यता असते. यासाठी विल्यानंतर पाठीमागचा भाग गरम पाणी व सौम्य जंतुनाशकाचा वापर करून धुऊन काढावा व योनीची जागेची स्वच्छता ठेवावी.
  • शेळ्यांसाठी पावसाळ्यात (Goat Care In Rainy Season) कोरड्या वैरणीचा अधिकाधिक वापर करावा. जसे की ज्वारीच्या कडब्याची कुट्टी, हरभरा भुस्सा, तूर भुस्सा.