PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी हप्ता 8,000 रुपये करावा! कृषी तज्ज्ञांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये पीएम किसान (PM Kisan Samman Nidhi) सन्मान निधी योजनेतील हप्त्याची रक्कम सध्याच्या 6,000 रूपयांवरून 8,000 रुपये करण्याची मागणी कृषी तज्ज्ञांनी (Agriculture Expert) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांच्याकडे केली आहे.

सध्या वाढत्या शेतीच्या खर्चामुळे (Agriculture Production Cost) शेतकर्‍यांवर आर्थिक ताण येत आहे. त्यातच खते, बियाणे, आणि इतर कृषी साहित्याच्या किंमतीत झालेली वाढ झालेली आहे. पावसाचा लपंडाव आणि बदलते हवामान (Climate Change) यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व कारणांच्या पार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी योजनेचा निधी (PM Kisan Samman Nidhi) वाढवण्याची मागणी केलेली आहे.

मोदी सरकारने (Modi Government Scheme) 2019 मध्ये सुरू झालेली पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) सुरू केलेली आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जातात. देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात 3.24 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे.

अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पीएम किसान हप्त्याची (PM Kisan Samman Nidhi) रक्कम वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास सुद्धा मदत होईल.

हे सुद्धा वाचा – ‘यांना’ मिळणार नाही ‘पीएम किसान सन्मान निधी योजनेचा’ लाभ