हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या सात महिन्यांपासून शासकिय धानाची भरडाई (Dhan Bhardai) ठप्प होती. शासन (Government) आणि राईस मिलर्स (Rice Millers) यांच्यातील अनुदानावर (Dhan Bhardai Subsidy) चर्चा फिसकटल्याने ही परिस्थिती उद्भवली होती. परंतु आता राईस मिलर्स यांची शासनासह चर्चा झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील (Gondia District) 320 राईस मिलर्सने शासकिय धानाची भरडाई करण्यासाठी करारनामे केले आहे, तर भरडाईसाठी (Dhan Bhardai) 6 लाख क्विंटल धानाची उचल केल्याची माहिती आहे.
शेतकर्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात हमीभावाने धान खरेदी (Paddy MSP) केली जाते. धान खरेदी केंद्रावर (Paddy Procurement Center) खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार करून त्याची भरडाई करून शासनाकडे सीएमआर तांदूळ जमा केला जातो. पुढे याच तांदळाचे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वितरण केले जाते. मात्र, यंदा राईस मिलर्सने धान भरडाईचे दर, वाहतूक भाडे, भरडाईच्या अनुदानात वाढ, वाहतूक भाड्याची थकीत रक्कम आदी विषयांना घेऊन शासकिय धान भरडाईवर (Dhan Bhardai) बहिष्कार टाकला होता. जवळपास सात महिने हा बहिष्कार कायम होता.
त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने (Marketing Federation) खरीप आणि रब्बी हंगामात खरेदी केलेल्या 29 लाख क्विंटल धानाची उचल थांबली होती, तर आदिवासी विकास महामंडळाला (Adivasi Development Corporation) खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने रब्बीत धान खरेदी बंद ठेवण्याची वेळ आली. तब्बल सात महिन्यांच्या कालावधीनंतर शासन आणि राईस मिलर्स यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आता राईस मिलर्स शासकिय धानाची भरडाई (Shaskiya Dhan Bhardai) करण्यास तयार झाले आहे. भरडाईसाठी 320 राईस मिलर्सने करारनामे केले असून 29 लाख क्विंटल धानापैकी 6 लाख क्विंटल धानाची आतापर्यंत उचल केली आहे.
15 दिवसांत जमा होणार तांदूळ
शासकिय धान खरेदी केंद्रावर भरडाईसाठी धानाची उचल केल्यानंतर राईस मिलर्सला 15 दिवसांत धानाची भरडाई (Dhan Bhardai) करून तो शासनाकडे जमा करावा लागणार आहे. तशा सूचनासुद्धा संबंधित विभागाने राईस मिलर्सला केल्या आहेत.
भरडाईची प्रक्रिया डिसेंबर पर्यंत
यावर्षी शासकिय धानाची भरडाईसाठी उचल होण्यास 7 महिने विलंब झाला आहे. परिणामी, 29 लाख क्विंटल धानाची भरडाई (Dhan Bhardai) रखडली होती. आता भरडाईसाठी धानाची उचल करण्यास प्रारंभ झाला असून डिसेंबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालण्याची शक्यता आहे.