हॅलो कृषी ऑनलाईन: गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान (Cow Milk Subsidy) देण्याबाबत शासनाने घेतलेला निर्णय आता 30 सप्टेंबर पर्यंत (Application Deadline) चालू राहणार आहे. राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांना (Milk Projects) दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकर्यांना या अनुदानाचा (Cow Milk Subsidy) लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित फार्मर प्रोड्युसर कंपनी (FPC) यांनी 30 सप्टेंबर पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग मुंबई (Department of Dairy Development Mumbai) मुंबई यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
कोण असणार अनुदान योजनेचे लाभार्थी (Cow Milk Subsidy)
- सहकारी दूध संघ
- खाजगी दूध प्रकल्प
- दूध शितकरण केंद्र
- फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्ध व्यवसायाशी संबंधित)
अनुदानासाठी आवश्यक गोष्टी
- डीबीटीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे (Dairy Farmers) बँक खाते, आधारकार्ड आणि पशुधनाच्या कानातील बिल्ल्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
- दूध उत्पादक शेतकरी हे दूध संघ किंवा खाजगी प्रकल्पाला दूध पुरवठा करणारे असावेत.
- सहकारी संघ आणि खाजगी प्रकल्पांनी शेतकर्यांचा डेटा अपलोड करण्यासाठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी (Regional Dairy Development Officer), अमरावती